शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

औरंगाबादमध्ये १६ दिवसांमध्ये कोविड सेंटर उभारणारे अभियंता भूषण हर्षे ठाण्यात रुजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 01:30 IST

अल्पावधीत रुग्णालयाची उभारणी केल्याबद्दल उद्योगमंत्री देसाई यांनीही कार्यकारी अभियंता भूषण हर्षे विशेष कौतुक केले होते. ठाणे विभागातील वागळे इस्टेट, तारापूर आणि अंधेरीचे कार्यक्षेत्र त्यांच्याकडे असून अंधेरीतील एसआरए प्रकल्प येत्या काही दिवसांमध्ये मार्गी लावण्याचा मनोदय त्यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केला.

ठळक मुद्दे ठाण्याच्या औद्योगिक विकास महामंडळात नियुक्तीएसआरएचा प्रकल्प मार्गी लावणार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: औरंगाबादमध्ये अवघ्या १६ दिवसांमध्ये ३०० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारणारे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे हे आता ठाण्यात बदलीने रुजू झाले आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ठाणे विभाग क्रमांक एकच्या कार्यकारी अभियंता पदी त्यांची राज्य शासनाने नुकतीच नियुक्ती केली आहे.सरळ सेवा पद्धतीने जुलै २०१५ मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळात त्यांची नियुक्ती झाली. महामंडळाच्या लातूर विभागात २०१५ च्या दुष्काळी परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने उद्योगांचा पाणी पुरवठा सुस्थितीमध्ये ठेवण्यासाठी ते प्रयत्नशील होते. जून २०१६ ते २०१८ या दरम्यान धुळे विभागांतर्गत जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्हयातील उद्योग विकासासाठी तसेच उद्योगासाठी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. पुढे २०१८ ते जुलै २०२१ पर्यंत ते औरंगाबाद येथे कार्यरत होते. याच काळात औरंगाबाद येथे नवीन ७२ दशलक्ष घन मीटर इतकी प्रती दिन पाणी पुरवठा योजना त्यांनी कार्यान्वित केली. याशिवाय, ३१ मेट्रिक टन प्रति दिन क्षमतेचे अघातक कचरा संकलन, उपचार विल्हेवाट आणि व्यवस्थापन सयंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. कोविड काळात महामंडळातर्फे ५० टक्के आॅक्सिजनची व्यवस्था असलेले ३०० खाटांचे सुसज्ज असे कोविड केअर सेंटर वैद्यकीय उपकरणांसह तयार करुन त्यांनी ते महापालिकेला सुपूर्द केले. अल्पावधीत रुग्णालयाची उभारणी केल्याबद्दल उद्योगमंत्री देसाई यांनीही त्यांचे विशेष कौतुक केले होते. ठाणे विभागातील वागळे इस्टेट, तारापूर आणि अंधेरीचे कार्यक्षेत्र त्यांच्याकडे असून अंधेरीतील एसआरए प्रकल्प येत्या काही दिवसांमध्ये मार्गी लावण्याचा मनोदय त्यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केला.

टॅग्स :thaneठाणेMIDCएमआयडीसी