एसटी स्टॅण्डमध्ये अखेर साफसफाईला सुरूवात
By Admin | Updated: May 22, 2016 01:37 IST2016-05-22T01:37:34+5:302016-05-22T01:37:34+5:30
ठाण्यातील तिन्ही एसटी स्टॅण्डमधील दुरवस्थेचे चित्रण ‘अस्वच्छता अन दुर्गंधीचे आगार’ या मथळ््याखाली ‘लोकमत’ने ‘हॅलो ठाणे’ मध्ये मांडताच तेथील अधिकारी खडबडून जागे झाले

एसटी स्टॅण्डमध्ये अखेर साफसफाईला सुरूवात
ठाणे : ठाण्यातील तिन्ही एसटी स्टॅण्डमधील दुरवस्थेचे चित्रण ‘अस्वच्छता अन दुर्गंधीचे आगार’ या मथळ््याखाली ‘लोकमत’ने ‘हॅलो ठाणे’ मध्ये मांडताच तेथील अधिकारी खडबडून जागे झाले असून त्यांनी स्वच्छतेला सुरूवात केली आहे. आधी प्रतिक्रिया देण्यास नकार देणाऱ्या या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’मधील मजकूर म्हणजे सरकारची बदनामी आहे, असा जावईशोधही लावला. मात्र स्वच्छतेसाठी आलेला निधी गेला कुठे, स्वच्छतेसाठी नेमलेले कामगार काय करतात, त्यावर देखरेख ठेवणाऱ्यांनी आजवर नेमकी काय कामे केली याचा जाब विचारताच त्यांची घाबरगुंडी उडाली.
एसटी स्टॅण्ड स्वच्छ आहे, असा दावा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी जेव्हा स्टॅण्डमधील अस्वच्छतेची किळसवाणी छायाचित्रे पाहिली तेव्हा ते गप्प बसले. त्यावरही वरिष्ठांकडे जाण्याची धमकी देत निनावी फोन करणाऱ्या अधिकाऱ्यांना जेव्हा नावानिशी तुमची प्रतिक्रिया प्रसिद्ध करतो असे सांगितले, तेव्हा स्वत:चे नावही सांगण्याची तसदी न घेता त्यांनी फोन बेद केले. त्यानंतर मात्र त्यांनी तातडीने साफसफाईची मोहीमच हाती घेतली.
‘लोकमत-रिपोर्टर आॅन द स्पॉट’ या सदरात एसटी स्टॅण्डच्या दुरवस्थेच्या मजकुरात अस्वच्छता, दुर्गंधी, पिण्याच्या पाण्याची अपुरी सोय, गर्दुल्ल्यांचा वावर, बंद पंखे यासारख्या अनेक समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला होता. हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर खोपट, ठाणे रेल्वे स्थानक आणि वंदना एसटी स्टॅण्ड या तिन्ही एसटी स्टॅण्डच्या साफसफाईला सुरूवात झाली आहे.
(प्रतिनिधी)