शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

जिल्ह्यात भाजीपाला वाढविण्यासाठी गटशेतीला प्रोत्साहन द्या - एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 20:23 IST

शहरांमधील गृहसंकुलांमध्ये शेतीतील भाजीपाला थेट विकण्यासाठी ग्रामीण भागातील महिला बचत गटांना देखील वाहतुकीच्या दृष्टीने काही सवलती द्याव्यात, पिक कर्ज, विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त मिळावा अशा विविध सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात बारमाही शेती झाली पाहिजे विशेषत: भेंडी, ढोबळी, कारली अशा विविध भाज्या घेण्यासाठी शेतकऱ्यांना गटशेतीच्या माध्यमातून प्रोत्साहित करावे, शहरांमधील गृहसंकुलांमध्ये शेतीतील भाजीपाला थेट विकण्यासाठी ग्रामीण भागातील महिला बचत गटांना देखील वाहतुकीच्या दृष्टीने काही सवलती द्याव्यात, पिक कर्ज, विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त मिळावा अशा विविध सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या.ते आज नियोजन भवन येथे कृषी विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व तयारी बैठकीत बोलत होते. यावेळी आमदार सुभाष भोईर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा जाधव, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, कृषी सभापती उज्वला गुळवी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील,  मुख्य वन संरक्षक किशोर, ठाकरे, जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे, विभागीय कृषी अधिकारी अंकुश माने यांची  उपस्थिती होती.

शेतकऱ्यांना निर्यातीचे तंत्र समजवावेपालकमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षी भाताची हेक्टरी उत्पादकता १९६० किलो इतकी घसरली ती २५०० हेक्टरवर जाणे गरजेचे आहे. याशिवाय भाज्यांचे क्षेत्रही वाढवून शेतकऱ्यांना निर्यातीचे तंत्र समजावून सांगण्यासाठी कृषी अधिक प्रयत्न करावेत.केवळ भात ,नागली, वरई ही पिके न घेता रब्बी हंगामाचा सुद्धा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे

पिक कर्ज, विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त मिळावागेल्या वर्षी २०५ कोटी पिक कर्जाचे उद्दिष्ट्य असतांना १३५ कोटी वाटप झाले, यंदा २२५ कोटींचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे ते साध्य झाले पाहिजे असे नियोजन करावे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना तसेच पंतप्रधान पिक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसे समाविष्ट करून घेता येईल हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

गाळ उपसण्यासाठी खासगी संस्थांची मदत घ्यागाळ उपसणे, बंधारे बांधणे, नाल्यांचे रुंदीकरण अशा कामांमध्ये खासगी संस्था आणि कंपन्यांचा सहभाग वाढवून मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवारची कामे हाती घ्यावीत जेणे करून पाणीसाठे वाढतील असे सांगून पालकमंत्री यांनी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने खरड येथील तलावातील तसेच कल्याण जवळील वाकळण तलावातील गाळ काढल्याने आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना कसा फायदा झाला ते सांगितले. यंदा देखील वनराई बंधाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे व शेततळ्यांची कामे झाली पाहिजेत असे ते म्हणाले.

कीटकनाशके , बियाणे यांचा पुरेसा पुरवठा कराखरीप हंगामापूर्वी म्हणजे १५ ते २० मे पर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुरेसे बियाणे , किटकनाशके मिळतील हे पाहण्याचे तसेच जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांच्या अनुभवांचा फायदा इतरांना कसा मिळेल यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिका, भाजीपाला मिनीकीटचे वाटप करण्यात आले. यावेळी कृषी विभागाच्या घडीपत्रिकांचे देखील विमोचन झाले.

जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे  यांनी प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात जिल्ह्यात ६३ हजार हेक्टर जमिनीवर खरीप पिकांची लागवड करण्यात येणार असून शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रांमार्फत योग्य ती मदत केली जाईल तसेच भरारी पथकेही लक्ष्य ठेऊन आहेत असे सांगितले. पंतप्रधान पिक विमा योजनेत जास्तात जास्त शेतकऱ्यांना  समाविष्ट करणार असल्याचे ते म्हणाले.मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी देखील जिल्हा परिषदेमार्फत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगितले.

शेतीचे उत्पन्न दुपटीपेक्षा अधिक वाढविणारप्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जे एस घोडके यांनी सादरीकरण करून २०२२ पर्यंत जिल्ह्यात शेतीचे उत्पन्न दुपटीपेक्षा अधिक वाढविण्याचे नियोजन करीत असल्याची माहिती दिली तसेच सादरीकरण केले. शेवटी कृषी विकास अधिकारी डॉ प्रफुल्ल बनसोडे यांनी आभार मानले. संचालन डॉ तरुलता धानके यांनी केले.

सादरीकरणातील ठळक मुद्दे·        जिल्हयाचा सरासरी पाऊस 2517.8 मि.मी. असुन सन 2017मध्ये पडलेला पाऊ स 3439.9 मि.मी .आहे.·        जिल्हयाचे खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र: 65909 हेक्टर असुन2017 मध्ये लागवड क्षेत्र एकुण 59539  हेक्टर आहे. ( 90 टक्के )·        सन 2018-19 मध्ये 63905 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन.·        मुख्य पिक भात सर्वसाधारण क्षेत्र  : 59279 हेक्टर.·        भात पिकाची सरासरी उत्पादकता  : 2561 किलो/हेक्टर.·        भात पिकाची 2017-18 ची उत्पादकता  :  1960 किलो/हेक्टर .·        सन 2018-19 ची भात बियाणे मागणी : 10565 क्विंटल(बियाणे बदल - 45 टक्के ) सन 2017 -18 बियाणे विक्री 9772क्विंटल.·        सन 2018-19 खताची मागणी 21690 मे.टन(सन 2017-18मधील पुरवठा:10070 मे.टन )·        ठाणे जिल्हयात 146 बियाणे विक्रेते 193 खत विक्रेते व 119किटकनाशके विक्रेते आहेत.·        जिल्हयात 1 पुर्ण वेळ व 17 अर्धवेळ निरिक्षक असे एकुण 18गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक  कार्यरत आहेत. त्यांचे व्दारे 299बियाण्यांचे, 150 खताचे व 88 किटकनाशकांचे नमुने काढण्यातआले.·        खते व किटकनाशके यांची उपलब्धता व गुणवत्ता याबाबततक्रारीसाठी शेतक-यांना टोल फ्री. नंबर 1800-233-4000 वरमाहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.·        सन 2017-18 मध्ये रुपये 9426.95 लक्ष पिक कर्जाचे वितरणकरण्यात आले.·         सन 2017-18 मध्ये राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत 433गावातील 7823 नमुने काढुन तपासण्यात आले. 32741 शेतकऱ्यांनामृद आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले.·        सन 2017-18 मध्ये उन्नत शेती समृध्द शेतकरी मोहिमेअंतर्गतकृषि यांत्रिकीकरण उपअभियान ,राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व राष्ट्रीयकृषि विकास योजना अंतर्गत जिल्हयात एकूण 107 पॉवर टिलर  55ट्रॅक्टर , 9 रोटॅव्हेटर , 2  कल्टीव्हेटर, 1 रिपर  व 1 थ्रेशर  असे एकुण175 यंत्र व कृषि औजारे वाटप करण्यात आले.·        सन 2017-18 मध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत केंद्रपुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजनेमध्ये जिल्हयात 75 शेतक-यांच्या 67.04हेक्टर क्षेत्रावर सुक्ष्म सिंचन संच बसविण्यात येउून रू.13.82 लाखअनुदान शेतक-यांचे खात्यावर वाटप करण्यात आले.·        जिल्हा कृषि महोत्सव ठाणे येथे दि.11 ते 15 मार्च 2018 मध्येआयोजन करण्यात आला. महोत्सवात रु.90.63 लाखाची उलाढालशेतमाल विक्रीतुन झाली.

          सन 2018-19 मध्ये राबविण्यात येणा-या वैशिष्टयपूर्णबाबी

·        जिल्हा कृषि महोत्सव - सन 2018-19 मध्ये ठाणे येथे आयोजितकरण्याचे नियोजन आहे.·        शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री 2018-19 मध्ये इच्छुकशेतकरी गटांना थेट विक्री करीता  कल्याण डोंबिवली महानगरपालिकाकार्यक्षेत्रा अंतर्गत 5 जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन.·        राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत सन 2018-19 मध्ये 433गावांतील 8780 नमुने काढण्याचे लक्षांक आहे.·        सन 2018-19 मध्ये रुपये 22500 लक्ष पिक कर्जाचे वितरणकरण्याचे लक्षांक.·        खते व किटकनाशके यांची गुणवत्ता सुधारणा साठी सन 2018-19करिता 299 बियाण्यांचे, 169 खताचे व 82 किटकनाशकांचे नमुनेकाढण्याचे लक्षांक.·        उन्नत शेती समृध्द शेतकरी मोहिमेअंंतर्गत कृषि यांत्रिकीकरणउपअभियान,राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व राष्ट्रीय कृषि विकासयोजना अंतर्गत सन 2018-19 मध्ये 200 पॉवर टिलर व 60 ट्रॅक्टरचेलक्षांक ठेवण्यात आलेले आहे.·        प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचनयोजनेमध्ये सन 2018 -19 करिता 150 हे. क्षेत्रावर संच बसविण्याचेनियोजन आहे.·        शेडनेट हाउस उभारणी  - सन 2018-19 मध्ये 10 शेडनेट हाउुसउभारणीचे नियोजन.·        हरितगृह उभारणी  - सन 2018-19 मध्ये 05 हरितगृह निमिर्तीचेलक्षांक·        प्लॅस्टीक मल्चींग - सन 2018-19 मध्ये एकात्मिक फलोत्पादनविकास अभियानांतर्गत भेंडी व कलिंगड पिकाकरीता 150 एकरक्षेत्रावर आच्छादनाचे नियोजन.·        वनपट्टे धारकांचा विकास - जिल्हयात 5150 वनपट्टे धारक असुन3193 हेक्टर वनपट्टे दिलेले आहेत. याअंतर्गत 232 लाभार्थ्याची 92.70 हे. वर मजगी, 296 लाभार्थ्याची 202.60 हेक्टर जुनी भातशेती ¤ãü¯ÃŸÖß कामे करण्यात आली. सन 2018-19 मध्येवनपटटेधारकांना शतकोटी वृक्ष लागवड ,फुलशेती ,भाजीपालालागवड, बांधावर तूर ,शेवगा लागवड ,मजगी  जुनी भात शेती इ.बाबींचा लाभ देण्याचे नियोजित आहे.·        व्हेजनेट/मँगोनेट - राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत 2017-18मध्ये मँगोनेट /व्हेजनेट अंतर्गत 320 भेंडी उत्पादक(244 हे.) व 19आंबा उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करुन त्यांना निर्यातक्षमभाजीपाला उत्पन्नाचे तंत्रज्ञान देण्यात आले.·        एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत 14 सामूहिक शेततळयाचेनियोजन.·        महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत 2018-19 मध्ये3000 हेक्टर फळबाग लागवडीचे उदिदष्ट ठेवण्यात आले आहे.·        मागेल त्याला शेततळे योजनेतंर्गत 300 शेततळे पूर्ण करण्याचेनियोजन केले आहे.·        समृध्द जनकल्याण योजनेतंर्गत नाडेप, गांडूळ खत, शेततळी,फळबाग लागवड इ. बाबींचे नियोजन करण्यात आले आहे.·        आत्मा योजनेतून नाविण्यपूर्ण प्रकल्पातंर्गत कुक्कुटपालना साठीठाणे जिल्हयातील शेतक-यांना देशी जातीच्या (कडकनाथ, वनराज,गिरीराज) कोंबडयांच्या पिलांचे वाटप संसद आदर्श गावांमध्ये करण्यातयेणार आहे.·        राज्यअंतर्गत प्रशिक्षणासाठी हॉटिर्कल्चर सेंटर ,तळेगाव दाभाडेयेथे 2018-19 मध्ये 100 शेतक-यांना हरितगृह व शेडनेट हाउुस तंत्रज्ञान  व्यवस्थापन प्रशिक्षण देणे प्रस्तावित आहे.·        सन 2018-19 मध्ये ठाणे जिल्हयातील 200 शेततळयामध्ये 120मत्स्यबीज सोडणे प्रस्तावित आहे.·        आत्मा योजनेतंर्गत सन 2018- 19 मध्ये 4000 भाजीपालामिनीकिट पॅकेटांचा महाबीज मार्फत पुरवठा करणे प्रस्तावित आहे.

टॅग्स :thaneठाणे