शिवसेनेतर्फे रोजगार मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:42 IST2021-08-22T04:42:51+5:302021-08-22T04:42:51+5:30

अंबरनाथ : बदलापुरात शिवसेनेच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना शाखाप्रमुख संदीप नवगिरे यांच्या वतीने ...

Employment fair on behalf of Shiv Sena | शिवसेनेतर्फे रोजगार मेळावा

शिवसेनेतर्फे रोजगार मेळावा

अंबरनाथ : बदलापुरात शिवसेनेच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना शाखाप्रमुख संदीप नवगिरे यांच्या वतीने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या माध्यमातून १५० पेक्षाही जास्त जणांना नोकरीची संधी मिळणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात उद्योगधंदे ठप्प झाल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अजूनही आर्थिक अडचणींमुळे उद्योग पूर्वपदावर आलेले नाहीत. त्यामुळे तरुणांकडून नोकरीसाठी धडपड सुरूच आहे. हीच बाब लक्षात घेता, शिवसेना शाखेने बदलापुरात रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. सानेवाडी परिसरात हा रोजगार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात २०० ते ३०० जणांनी नोंदणी केली असून, यापैकी १५० जणांना या मेळाव्याच्या माध्यमातून नोकरी मिळणार आहे.

---------------

Web Title: Employment fair on behalf of Shiv Sena