शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

‘अवकाळी’ सरींमुळे नोकरदारांची त्रेधातिरपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 01:20 IST

कल्याण-डोंबिवली : खड्ड्यांमध्ये साचले पाणी; बाजारपेठेत शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. जोरदार पडलेल्या सरींमुळे रस्ते ओले झाले, तर काही ठिकाणी पाणी जमा झाले. अचानक आलेल्या पावसामुळे सकाळच्या वेळेत कामावर निघालेल्या नोकरदारांची पंचाईत झाली.  

शहर व ग्रामीण भागात दोन दिवसांपासून हवामान ढगाळ होते. त्यामुळे वातावरणातील उष्मा काहीसा वाढला होता. टिटवाळा शहर व ग्रामीण भागांत गुरुवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला होता. त्यापाठोपाठ शुक्रवारी सकाळी कल्याण-डोंबिवलीत अवकाळी सरी बरसल्या. पावसामुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली. त्यामुळे भाजी, फळेविक्री न झाल्याने व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. त्यानंतर पावसाने दिवसभर विश्रांती घेतली असली तरी दिवसभर वातावरण ढगाळ होते. त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण नव्हते. रेल्वे स्थानक परिसरात सकाळी ११ नंतर काहीसी वर्दळ झाली. मात्र, त्या तुलनेने भाजी मार्केटमध्ये शुकशुकाट होता. सकाळी पावसामुळे अनेकांनी रिक्षेने प्रवास करणे पसंत केले.

दरम्यान, शहरात पाण्यामुळे चिखल झाला झाला होता. डांबरी रस्त्यांवर, तसेच खड्यांत पाणी साचल्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय झाली होती. तर, वाहनांवर साचलेली धूळ व त्यावर पडलेल्या पावसामुळे वाहने खराब झाली होती. रेल्वे, बस सेवेवर पावसाचा काही परिणाम झाला नव्हता. सर्वत्र सुरळीत वाहतूक सुरू होती. शहरात वीजपुरवठाही सुरळीत सुरू असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

शहापूर तालुक्यात अवकाळी पाऊस भातसानगर : अवकाळी पावसाने गुरुवारी शहापूर तालुक्यात जोरदार हजेरी लावली. सायंकाळी अचानक ढग दाटून आले, तसेच जोरदार वारा आणि पावसाने सगळ्यांची झोपच उडाली. कोरोना, अवकाळी पावामुळे गेलेली भातपीक, बर्ड फ्ल्यू, आता दोन चार दिवसांनी पडणारे ढगाळ हवामान आणि पाऊस, यामुळे तर शेतकरी, व्यावसायिक हताश झाले आहेत. आवरे, कांबारे, साजिवली, बिरवाडी, कुकांबे, शहापूरसह अनेक भागांत जोरदार पाऊस झाला.  

उल्हासनगरात रिमझिम सरीउल्हासनगर : शहरात शुक्रवारी सकाळी रिमझिम सरी कोसळल्या. पावसाने रस्ते निसरडे झाले. पाऊस असल्याने बहुतांश नागरिकांनी मॉर्निंग वॉकला जाण्याचे टाळले. सकाळी १०च्या दरम्यान दाट धुके पडले. दरम्यान, तांत्रिक कारणामुळे विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.वीटभट्टी व्यावसायिकांना फटका लोकमत न्यूज नेटवर्क मुरबाड : गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असतानाच गुरुवारी रात्रीच्या सुमारास रिमझिम पाऊस झाल्याने भेंडी, काकडीसह तुरीच्या लागवडीला फटका बसला आहे. वीट व्यावसायिकांच्या कच्च्या विटा भिजून मोठे नुकसान झाले आहे.आणखी दोन ते चार दिवस असेच वातावरण राहिले तर वीट उद्योगासोबत काकडी, भेंडी, मिरचीसारखी नगदी पिके पूर्णत: वाया जाणार आहेत. तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामानंतर दुबार पिके घेण्याकडे वळला आहे. भातपिकाची काढणी झाली की काकडी, भेंडी, सिमला ही जास्तीचा फायदा मिळवून देणारी उत्पादने घेतली जातात. सोबत अनेक शेतकरी भातशेतीच्या बांधावर तुरीची लागवड करू लागलेत. तसेच वीट व्यवसायही मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण असतानाच गुरुवारी रात्री तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. काकडी, भेंडीवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावला आहे.