शहरं
Join us  
Trending Stories
1
लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
5
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
6
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
7
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
8
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
9
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
10
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
11
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
12
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!
13
हृदयस्पर्शी! शाळेच्या लाडक्या दास काकांची ३८ वर्षांची सेवा, वाजवली शेवटची घंटा; पाणावले डोळे
14
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
15
दिवाळीनिमित्त मराठी अभिनेत्रीने पोस्ट केला लेकाचा गोड फोटो; म्हणाली, "माझ्या छोट्या स्टारची..."
16
WhatsApp युजर्सना मोठा धक्का; ChatGPT चा वापर करू देणार नाही मेटा, कारण...
17
"मोठी सती सावित्री बनून फिरतेय, रीलमध्ये फक्त पेटीकोटवर...", तान्या मित्तलची मालतीकडून पोलखोल
18
"आर्यनने त्याच्या दु:खावर सर्वांना हसवलं...", लक्ष्य लालवानीने केलं शाहरुखच्या लेकाचं कौतुक
19
"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा
20
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...

छोट्या दागिन्यांवर भर; मंदीने सराफ बाजार झाकोळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 05:45 IST

मंगळवारी २४ कॅरेटच्या सोन्याचा तोळ्याचा दर ३९ हजार ५०० रुपये, तर चांदीचा दर ४६ हजार ५०० रुपये प्रतिकिलो होता.

- अनिकेत घमंडीडोंबिवली : गेल्या सात वर्षांमधील सोन्याच्या दरांतील उच्चांक यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर गाठला असल्याने साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसºयाला सोने खरेदीची परंपरा टिकवायची म्हणून छोटे अलंकार किंवा सोन्याची कमी वजनाची वळी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल होता. त्यामुळे दरवर्षीसारखी हजारो कोटी रुपयांची उलाढाल राज्यात झाली नसल्याचे महाराष्ट्र सुवर्णकार सराफ महामंडळाने सांगितले.मंगळवारी २४ कॅरेटच्या सोन्याचा तोळ्याचा दर ३९ हजार ५०० रुपये, तर चांदीचा दर ४६ हजार ५०० रुपये प्रतिकिलो होता. देशातील आर्थिक मंदीचा फटका देशभरातील एक कोटी सुवर्ण कारागिरांना बसला असून त्यांच्यावर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. दसºयानिमित्त असमाधानकारक व्यवसाय झाल्याने देशामधील सहा लाख सराफांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यातच आयात शुल्क वाढवण्यात आल्याने आयात घटली आहे. त्याचा परिणाम दरावर होत असून त्याची झळ खरेदीदाराला बसते आहे.आॅल इंडिया जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी डोमेस्टिक काऊन्सिलचे माजी रिजनल अध्यक्ष तसेच महाराष्ट्र सुवर्णकार सराफ महामंडळाचे सल्लागार नितीन कदम (ठाणे) यांनी ही खंत ‘लोकमत’कडे व्यक्त केली. ते म्हणाले, सोन्याच्या भाववाढीने उच्चांक गाठल्याचा फटका जसा ग्राहकाला बसतो आहे तसा तो सराफ व्यावसायिकांनाही बसतो आहे. देशात सुमारे तीन कोटी सुवर्ण कारागीर होते. सोन्याच्या प्रचंड दरवाढीमुळे ग्राहक नसल्याने आणि सोन्याच्या मागणीत कमालीची घट झाल्याने त्यापैकी सुमारे एक कोटी कारागिरांवर बेकारीची कुºहाड कोसळली आहे. पश्चिम बंगाल, कारवार तसेच महाराष्ट्र आदी भागांमधील कारागिरांना मोठा फटका बसला आहे. एखादा दागिना घडवण्यासाठी साधारणपणे पंधरा प्रकारच्या विविध पद्धतींनी त्यावर कलाकुसर केली जाते. दागिना घडवण्याच्या कलाकुसरीसाठी प्रत्येक कारागिराचे कौशल्य असते, तीच त्यांची ओळख असते. त्यामुळे केंद्र सरकारने कोट्यवधी कारागिरांवर, त्यांच्या कुटुंबीयांवर आलेल्या उपासमारीच्या संकटाची वेळीच गंभीर नोंद घ्यायला हवी. सराफ व्यवसाय तेजीत आणण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करायला हवेत. आमच्या विविध संस्थांची वर्षानुवर्षांची ही मागणी आहे, पण त्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने या व्यवसायातील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये फारसे यश येत नसल्याने अनेक व्यापारी जोड व्यवसायांकडे वळत आहेत. सराफ व्यावसायिकांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा सन्मानाचा होता. पण आता व्यवसायच नसल्याने दिवसेंदिवस सराफ व्यापारी नैराश्येत गेले आहेत. देशाच्या जीडीपीमध्ये साधारणपणे ७ टक्के योगदान हे सराफ बाजाराचे असते. त्यामुळे या व्यवसायाकडे कानाडोळा करून चालणार नाही, असेही कदम म्हणाले.पॅकेज देण्याची गरजबँका गोल्ड लोन देत नाहीत, ही समस्या आहे. तसेच केंद्र सरकारकडून या उद्योगाला अन्य उद्योगांप्रमाणे तग धरण्यासाठी पॅकेज दिले जाण्याची गरज आहे. दसºयाला ग्राहकांनी वळे, चेन, कानातले, छोटी मंगळसूत्रे, अंगठ्या अशा छोट्या दागिन्यांची खरेदी करून केवळ मुहूर्त साधला, असे निरीक्षण नितीन कदम यांनी नोंदवले.

टॅग्स :Goldसोनंbusinessव्यवसाय