शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहाला आलिंगन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 23:44 IST

भिवंडीतील प्रकार : ५० ते ६० जणांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

भिवंडी : कोरोनाने मृत्यू झालेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांनी अंत्यविधीसाठी रुग्णालयातून ताब्यात घेतला. प्लास्टिकमध्ये बांधलेला मृतदेह अंत्यसंस्कारपूर्वी नातेवाईकांनी बाहेर काढून त्याला अलिंगन दिल्याचा धक्कादायक प्रकार येथील कामतघर परिसरात घडला आहे. ५० ते ६० जणांच्या उपस्थितीत अंत्ययात्रा काढली. हा प्रकार पालिका प्रशासनाला एका नागरिकाने कळवताच परिसरात खळबळ उडाली. यामुळे आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

भिवंडीत मागील १५ दिवसात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कामतघर परिसरात राहणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने कळवा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यांनतर रुग्णालय प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. नातेवाईकांनी मृतदेह अंत्यविधीसाठी घरी आणला. प्लास्टिकमध्ये बांधलेला मृतदेह बाहेर काढून १० ते १५ जणांनी अलिंगन देत दु:ख व्यक्त केले. त्यांनतर ६० जणांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ही माहिती परिसरातील माजी नगरसेवक कमलाकर पाटील यांना मिळताच त्यांनी पालिका आयुक्तांना घडलेल्या प्रकाराची माहिती देताच आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी सहायक आयुक्त सुदाम जाधव यांना सूचना देऊन पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जाधव यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाच्या संपर्कात आलेल्या ४५ जणांना तातडीने क्वारंटाइन केले.परिसर केला सीलपालिकेने ४५ जणांना क्वारंटाइन केले असून, त्यांचे कोरोना चाचणीचे अहवाल तपासणीसाठी पाठविले आहेत. हा संपूर्ण परिसर सील केला आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या नातेवाइकांनी अंत्यसंस्कारास उपस्थित राहावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका