साडेपाच लाखांच्या सोन्याचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:41 IST2021-04-07T04:41:42+5:302021-04-07T04:41:42+5:30

------------- दुचाकी चोरीला डोंबिवली : सांगर्ली परिसरात राहणारे संदीप नाईक यांनी त्यांची दुचाकी रविवारी रात्री १०.३० वाजता ठाकुर्ली येथील ...

Embezzlement of five and a half lakhs of gold | साडेपाच लाखांच्या सोन्याचा अपहार

साडेपाच लाखांच्या सोन्याचा अपहार

-------------

दुचाकी चोरीला

डोंबिवली : सांगर्ली परिसरात राहणारे संदीप नाईक यांनी त्यांची दुचाकी रविवारी रात्री १०.३० वाजता ठाकुर्ली येथील ९० फुटी रोडवरील सिटी दरबार हॉटेल येथे उभी केली होती. तेथून ती गाडी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात नाईक यांनी तक्रार केली आहे.

-------------------------------------

दीड लाखांची रोकड चोरीला

कल्याण : खडकपाडा येथील रहिवासी उत्तम मोरे हे सोमवारी दुपारी १२.३० वाजता शिवाजी चौकातून जात होते. महानजवाडी येथे पोहोचल्यावर त्यांना त्यांच्या हातातील पिशवी चोरीला गेल्याचे समजले. पिशवीत एक लाख ५५ हजारांची रोकड आणि मोबाइल असा मुद्देमाल होता. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरून चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

------------

कल्याणमध्ये दुचाकीची चोरी

कल्याण : सुरेश क्रिष्णानी यांनी त्यांची दुचाकी १७ मार्चला सायंकाळी ७.३० ला मुरबाड रोडवरील वोडाफोन गॅलरीजवळील गणेश इलेक्ट्रॉनिक दुकानासमोर पार्क केली होती. तेथून ती गाडी चोरीला गेली आहे. या प्रकरणी सोमवारी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

------------

Web Title: Embezzlement of five and a half lakhs of gold