शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटना : कल्याण-डोंबिवली पत्रकार संघानं नोंदवला सरकारविरोधात निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 13:22 IST

एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन पुलावर झालेल्या दुर्घटनेसंदर्भात प्रशासनाविरोधात कल्याण-डोंबिवली पत्रकार संघाने निषेध नोंदवला आहे.

डोंबिवली - एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन पुलावर झालेल्या दुर्घटनेसंदर्भात प्रशासनाविरोधात कल्याण-डोंबिवली पत्रकार संघाने निषेध नोंदवला आहे. बहुतांशी माध्यमांची कार्यालये एलफिन्स्टन - परळ भागात आहेत. अनेक पत्रकारांनाही या गर्दीचा सामना करावा लागतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने वेळीच यावर तोडगा काढावा, जेणेकरून प्रवाशांना दिलासा मिळेल.  डोंबिवली स्थानकाच्या पूर्वेला रामनगर तिकीट विंडोजवळ निषेध तसंच दुर्घटनेतील मृतांना आदरांजली वाहण्यात आली.  कल्याण-डोबिवली पत्रकार संघातली सदस्यांनी काळ्या फिती लावून रेल्वे प्रशासन आणि सरकारचा मूक निषेध केला. 29 सप्टेंबरला एलफिन्स्टन रेल्वे स्थानकात झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळपणावर आणि सरकारच्या वेळकाढू भूमिकेवर चौफेर टीका होत आहे. कल्याण आणि डोंबिवलीतून मुंबईला कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखांच्या घरात आहे. त्यातून रेल्वेला कोट्यवधींचे उत्पन्न मिळत असले तरी रेल्वे प्रवास सुरक्षित आणि सुखकर करण्याकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

सुरक्षित प्रवास, स्वच्छता, स्वच्छता गृह, फेरीवाले, अत्यावश्यक सुविधा आदी महत्त्वाचे प्रश्न रेल्वेने तातडीने सोडवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी कल्याण डोंबिवली पत्रकार संघाचे सदस्य, प्रवासी संघटनाचे पदाधिकारी, उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

शुक्रवारी नेमके काय घडले परळ-एलफिन्स्टन रेल्वे पुलावर?

कॉर्पोरेट कार्यालयांमुळे परळ-एलफिन्स्टन रोड व करी रोडसारख्या रेल्वे स्थानकांवर चाकरमान्यांचे वाढते लोंढे आणि तेथील अरुंद रेल्वे पुलांमुळे एक दिवस मोठी दुर्घटना होणार ही मुंबईकरांच्या मनातील भीती दुर्दैवाने शुक्रवारी खरी ठरली. एलफिन्स्टन रोड स्थानकावर शुक्रवारी (29 सप्टेंबर )सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास पादचारी पुलावर भीषण चेंगराचेंगरी होऊन 8 महिला आणि एका लहान मुलासह तब्बल 22 जणांचा यात बळी गेला, तर 39 प्रवासी जखमी झाले. तर शनिवारी उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीची ही पहिलीच घटना आहे. देशभरात नवरात्रीचा उत्साह संचारलेला असताना दस-याच्या तोंडावर मुंबईकरांवर मात्र दु:खाचा डोंगर कोसळला. मुंबईच्या इतिहासात आणखी एका ‘ब्लॅक फ्राय डे’ची नोंद झाली.

पश्चिम रेल्वेवरील एलफिन्स्टन रोडवरील पुलावर नेहमीच गर्दी असते. मध्य रेल्वेतील परळ स्थानकाला जोडणारा हा पादचारी पूल असल्याने प्रवासी या पुलाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. शुक्रवारी सकाळी परतीच्या पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली. यामुळे एलफिन्स्टन रोड स्थानकातील पायºया निसरड्या झाल्या होत्या. पावसामुळे प्रवासी आडोशासाठी पुलावर उभे राहिले. स्थानकांवरील गर्दी वाढत असतानाच अचानक ‘पूल कोसळला’, ‘शॉटसर्किट झाले’ अशा अफवांचे पेव फुटले. यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. ६ ते ७ फुटांच्या पूलावरून बाहेर जाण्यासाठी प्रत्येक प्रवासी धडपडत होता. यावेळी स्थानकावर एकाचवेळी अप आणि डाऊन दिशेने लोकल आल्यामुळे गर्दीत आणखी भर पडली.

गर्दीमुळे रेटारेटीचा जोर वाढल्याने अनेक प्रवासी पायांखाली तुडवले गेले. या दुर्घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त झाली. रेल्वे प्रशासनाने आणि राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. या घटनेनंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे मुंबईतील रेल्वेचे सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले.मृतांची नावेमुकेश मिश्रा, शुभलता शेट्टी, सुजाता शेट्टी, सचिन कदम, मयुरेश हळदणकर, अकुंश जयस्वाल, जोतिबा चव्हाण, सुरेश जयस्वाल, चंद्रभागा इंगळे, तेरेसा फर्नांडिस, रोहित परब, अ‍ॅलेक्स कोरिया, हिलोनी देढिया, चंदन गणेश सिंग, मुश्ताक रईस, तेली, प्रियांका पासरकर, मोहम्मद शकील, श्रद्धा वर्पे, मीना वरुणकर, विजय बहादूर, मसूद अलाम, सत्येंद्रकुमार कनोजियाजखमींची नावेआकाश परब, अजय कुमार, अनुज कुमार, अखिलेश चौधरी, जितेंद्र, जमालुद्दीन, इस्माइल खान, मोहम्मद शेख, नितेश, नरेश कांबळे, पीयूष ठक्कर, पुलवासी, प्रल्हाद कनोजिया, राहून अमिन, रुपेश, रमेश चौधरी, राकेश कदम, राहुल, श्रीनिवास, समीर फारुख, सूरज गौड, सुदीप तावडे, सुरज पटवा, रितेश राठोड, सागर पाटील, वसिम शेख, सुनील मिश्रा, विक्रम चौघुले, प्रमोद बागवे, अपर्णा सावंत, आशा पिंपळे, धुनिष्ठा जोशी, महानंदा सावंत, प्रतिभा, प्रज्ञा बागवे, शरयु गावडे, श्रद्धा नागवेकर, सीमा कोरीटाइमलाइनसकाळी ९.३० : परतीच्या पावसाची मुंबईत जोरदार हजेरी९.४५ ते १०.१० : स्थानकांवर गर्दीचे प्रमाण वाढले१०.३० : रेल्वे प्रशासनाला घटनेची माहिती१०.३३ : स्थानिकांचा एल्फिन्स्टन स्टेशन मास्तरला फोन१०.४५ : स्थानिकांचा मदतीसाठी पुढाकार११.०० : सर्व पोलिस स्थानकांना अलर्टच्या सूचना११.३० : एल्फिन्स्टन दुर्घटनेत तीन प्रवासी ठार झाल्याचे वृत्त११.३२ : रेल्वे पोलीस व सुरक्षा बलाचे अधिकारी घटनास्थळी११.३८ : केईएम रुग्णालयात तीन मृत्यूंचा दुजोरा११.४५ : केईएममधून १५ प्रवासी ठार झाल्याची माहिती११.५० : पालिकेसह शासकीय यंत्रणेचे मदतकार्य१२.०० : एनडीआरएफचेपाच जवान घटनास्थळी दाखल१२.१० : वरिष्ठ रेल्वे अधिका-यांकडून अपघात स्थळाची पाहणी१२.२५ : केईएममधून२२ जण ठार झाल्याची माहिती

टॅग्स :Elphinstone Stampedeएलफिन्स्टन चेंगराचेंगरीIndian Railwayभारतीय रेल्वेcentral railwayमध्ये रेल्वे