व्हॅलिशिल्प प्रकल्पातील पात्र ग्राहकांना मुदत वाढ
By Admin | Updated: May 12, 2014 05:45 IST2014-05-11T21:43:48+5:302014-05-12T05:45:39+5:30
सिडकोच्या खारघर येथील बहुचर्चित व्हॅलीशिल्प गृहप्रकल्पात भाग्यवान ठरलेल्या अर्जदारांना आपल्या कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी १५ मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

व्हॅलिशिल्प प्रकल्पातील पात्र ग्राहकांना मुदत वाढ
नवी मुंबई: सिडकोच्या खारघर येथील बहुचर्चित व्हॅलीशिल्प गृहप्रकल्पात भाग्यवान ठरलेल्या अर्जदारांना आपल्या कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी १५ मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ठाणे जनता सहकारी बँकेच्या सर्व शाखांमधून अर्जदारांना आपल्या कागदपत्रांची पुर्तता करता येणार आहे.
खारघर सेक्टर ३६ येथे सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या गृहप्रकल्पात एकूण १२२४ सदनिका आहेत. या घरांसाठी २४ मार्च रोजी सिडकोने सोडत काढली होती. या सोडतीत भाग्यवान ठरलेल्या ग्राहकांना ३0 एप्रिलपर्यंत आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्यास सांगण्यात आले होते. मात्र मुदत उलटून गेली तरी अनेकांनी आपल्या कागदपत्रांची पुर्तता केलेली नाही. तर यासाठी आणखी मुदत देण्याची मागणी अनेक ग्राहकांनी सिडकोकडे केली होती. यापार्श्वभूमीवर सिडकोने कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी १५ मे पर्यंतची मुदत दिली आहे. (प्रतिनिधी)