ठाण्यात इलेक्ट्रिक डीपीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:41 IST2021-04-20T04:41:58+5:302021-04-20T04:41:58+5:30

ठाण्यात उन्मळून झाड पडले ठाणे : वर्तकनगर परिसरात सोमवारी सकाळी एक झाड रस्त्यावर पडल्याने त्या परिसरात काही प्रमाणात वाहतूककोंडी ...

Electric DP on fire in Thane | ठाण्यात इलेक्ट्रिक डीपीला आग

ठाण्यात इलेक्ट्रिक डीपीला आग

ठाण्यात उन्मळून झाड पडले

ठाणे : वर्तकनगर परिसरात सोमवारी सकाळी एक झाड रस्त्यावर पडल्याने त्या परिसरात काही प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळाल्यावर ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दल आणि पोलिसांनी धाव घेऊन झाड हटविण्यास सुरुवात केली. यावेळी एक फायर वाहन आणि एक क्युआरटी वाहन पाचारण केले होते.

.............

कंटेनर दुभाजकला धडकला

ठाणे : मुंब्रा बायपासवर पनवेल-खारेगाव या मार्गिकेवर भरधाव वेगाने आलेला कंटेनर दुभाजकाला धडकल्याची घटना सोमवारी सकाळी ६.३० वाजण्यास सुमारास घडली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली असून, घटनेची माहिती कळताच मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर क्रेन बोलवून कंटेनर रस्त्याच्या एका बाजूला केला. या घटनेमुळे वाहतुकीवर कोणताही परिमाण झाला नाही. हा अपघात कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

............................................

Web Title: Electric DP on fire in Thane