शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्शन आठवणी: महाजन यांचे नियोजन अन मुंडेंचे परिश्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:51 IST

रामभाऊ म्हाळगींच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेकरिता सक्षम उमेदवार नसल्याने मोठा पेच निर्माण झाला होता.

-जगन्नाथ पाटीलरामभाऊ म्हाळगींच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेकरिता सक्षम उमेदवार नसल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. त्यांच्यासारखे काम कोण करणार, असा सवाल सर्वच नेत्यांसमोर होता. त्यावेळी वसंतराव भागवत यांनी माझे नाव पुढे केले आणि क्षणार्धात निर्णय झाला. त्यावेळी सगळ्यांमध्ये वयाने मी लहान होतो.युतीचे शिल्पकार स्व. प्रमोद महाजन होते, तर गोपीनाथ मुंडे हे लोकनेते होते. महाजन यांच्याबद्दल आदर, प्रेम, आपुलकी नक्कीच होती आणि आहे. पण, तरीही मुंडेच जास्त प्रिय होते. १९८२ मध्ये मी ठाणे लोकसभेची निवडणूक लढवली, तेव्हा मतदारसंघ मोठा असल्याने प्रचंड प्रवास करावा लागत होता. दळणवळणासाठी साधनसामग्रीची वानवा होती. आजच्यासारखे ना मोबाइल, ना इंटरनेट सुविधा. दहाबारा गावांमध्ये एखाद्याच घरात दूरध्वनी असला तर असायचा. पण, कार्यकर्ते एकनिष्ठ होते आणि जीवाला जीव देणारी मंडळी होती. त्या निवडणुकीत मुरबाड तालुक्याची जबाबदारी स्व. मुंडे यांच्याकडे होती.स्वत:ची जीप घेऊन ते आले होते. महिनाभर त्यांनी तालुका पिंजून काढला होता. दुपारच्या जेवणाची ज्या गावपाड्यात असेल, तिथे सोय झाली तर झाली, नाही तर ठीक. पण, रात्रीचा मुक्काम मात्र मुरबाडमध्ये शहा यांच्याकडे होता. पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी पडेल ते काम त्यांनी केल्याचे मी जवळून पाहिले. महाजन हे निवडणुकीचे नियोजन अत्यंत चोख करायचे. महाजन यांचे नियोजन, मुंडे यांची मेहनत व कार्यकर्त्यांची साथ यामुळे मी १९८२ मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकलो. काँग्रेसचे प्रभाकर हेगडे, समाजवादी पक्षाचे दत्ताजी ताम्हाणे, शिवसेनेचे सतीश प्रधान यांना मी पराभूत केले होते. स्व. म्हाळगी यांच्या पत्नीने पुण्याहून येऊन माझ्यासाठी प्रचार केला होता. १९८४ मध्ये मात्र स्व. इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे देशातील वातावरण बदलले, मी निवडणूक हरलो. त्यावेळी स्व. शांताराम घोलप हे निवडून आले होेते.लोकसभेच्या दोन निवडणुका लढलो, पण पैसे नेमके किती खर्च झाले, हे माहीत नाही. पक्षाने खर्च केला. मला जो निधी दिला जायचा, तो दर सोमवारच्या आढावा बैठकीत मांडला जायचा. प्रत्येकाचे हिशेबाचे कागद गोळा केले जायचे. इतकी पारदर्शकता होती. आता निवडणुकीची समीकरणे फार बदलली आहेत. २००९ नंतरच्या निवडणुकांमध्ये ज्याच्या हाती सत्ता तोच पारधी, अशी अवस्था आहे.(माजी मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते)- शब्दांकन : अनिकेत घमंडी

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBJPभाजपा