संजय घरत यांच्यावर कडक कारवाईसाठी मुख्यमंत्र्याशी बोलणार- एकनाथ शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 21:06 IST2018-06-20T21:06:40+5:302018-06-20T21:06:40+5:30
लाचखोर संजय घरत हे कल्याण डोंबिवली महापालिकेत सेवेत येऊ नयेत यासाठी निलंबनाचा ठराव आधीच महापालिकेने केला आहे.

संजय घरत यांच्यावर कडक कारवाईसाठी मुख्यमंत्र्याशी बोलणार- एकनाथ शिंदे
डोंबिवली- लाचखोर संजय घरत हे कल्याण डोंबिवली महापालिकेत सेवेत येऊ नयेत यासाठी निलंबनाचा ठराव आधीच महापालिकेने केला आहे. त्यातूनही आता त्यांच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करणार असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. आठ दिवसांनी शिवसेनेच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्याची सर्वत्र चर्चा होती.कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी ते बुधवारी डोंबिवलीत आले होते. उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आदी भागातील सेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांनी चर्चा केली. निवडणुकीसाठी नेमके किती काम झाले आहे, किती सम्पर्क झाला आहे याचा अंदाज त्यांनी घेतला. घरत असोत की अन्य कोणीही जो अशी चूक करेल त्याला शिवसेना कधीही पाठीशी घालणार नाही असेही ते म्हणाले. त्यामुळे शिवसेना कधीही भ्रष्टाचाराचे समर्थन करत नाही करणार नाही असे ते म्हणाले