शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
3
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
4
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
5
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
6
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
7
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
8
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
9
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
10
Mhada: पैसे घेतले, पण घर दिलेच नाही; म्हाडाच्या एजन्सीनेच लोकांना फसवले!
11
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
12
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
13
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
14
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
15
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
16
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
17
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
18
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
19
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
20
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...

Kopri Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live: एकनाथ शिंदेच आनंद दिघेंचे खरे वारसदार! पुतण्या केदार दिघेंना किती मतं पडली, पाहा आकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 12:58 IST

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result Live Updates: एकनाथ शिंदे यांना दहा फेऱ्यांच्या मतमोजणी नंतर तब्बल ४५ हजार मतांची आघाडी

Kopri-Pachpakhadi Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live: महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यापासून धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या विचारांनी सरकार चालवण्यास सुरुवात केली. वेळोवेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे स्मरण ठेवत आपणच त्यांचे खरे वारसदार असल्याचे ठणकावून सांगितले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाण्याच्या कोपरी-पाचपाखाडीतूनएकनाथ शिंदे निवडणुकीत उभे राहिल्यानंतर शिवसेना-ठाकरे गटाने आनंद दिघे यांचा पुतण्या केदार दिघे ( Kedar Dighe ) यांना तिकीट दिले. आनंद दिघे यांचा खरा वारसदार कोण हे ही निवडणूकच ठरवेल अशाही ठाण्यात रंगल्या. या चर्चांना आज निकालाच्या निमित्ताने पूर्णविराम लागला आणि आनंद दिघेंच्या ठाण्यात एकनाथ शिंदेंनी मोठ्या फरकाने आघाडी घेतली.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा होत्या. त्यात विशेष करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखडी मतदारसंघाच्या निकालाकडे लक्ष लागून होते. या मतदार संघात एकनाथ शिंदे यांनी तुफान आघाडी घेत आपणच आनंद दिघे यांचे खरे वारसदार असल्याचे दाखवून दिले. आज मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरूवात झाली. पोस्टल मतमोजणीत पहिल्या कलांमध्ये महायुती आघाडीवर दिसली. ठाण्यातील कोपरी-पाचपाखडी मतदारसंघात पहिल्या कलांमध्ये एकनाथ शिंदे यांनी आघाडी घेतली  आहेत. ती आघाडी कायम ठेवली. १० फेऱ्यांनंतर एकनाथ शिंदे यांनी तब्बल ४५ हजार मतांची आघाडी घेतली. त्यांना ६२,११२ मते मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावरील यांना १६,१३३ मते मिळाली.

दरम्यान, शिवसेनेतील फुटीनंतर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार देण्याची रणनीती ठाकरे गटाकडून आखली जात होती. त्यामुळे ठाकरे गटाने कोपरी-पाचपाखडी मतदार संघातून आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली. दरम्यान, एकनाथ शिंदे हे कोपरी-पाचपाखडी मतदार संघातून तिनदा निवडून आले असून ते यंदाही याच मतदार संघातून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे येथे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे विजयी होणार हे आता जवळपास निश्चित आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kopri-pachpakhadi-acकोपरी-पाचपाखाडीthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणे