एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघ उपांत्य फेरीत
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 7, 2024 16:53 IST2024-05-07T16:52:35+5:302024-05-07T16:53:19+5:30
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधाराचा निर्णय बेनेटन क्रिकेट क्लबसाठी फायदेशीर ठरला नाही. त्यांच्या किरण साळेकरचा अपवाद वगळता इतर फलंदाजाना धावा जमवता न आल्याने बेनेटन क्रिकेट क्लबला मर्यादित १२३ धावांवर समाधान मानावे लागले.

एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघ उपांत्य फेरीत
ठाणे : गतविजेत्या एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या ब संघाने बेनेटन क्रिकेट क्लबचा एक गडी राखून पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित ठाणे प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. बेनेटन क्रिकेट क्लबने १२३ धावांचे आव्हान एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाने ९ गड्यांच्या मोबदल्यात १२४ धावा केल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधाराचा निर्णय बेनेटन क्रिकेट क्लबसाठी फायदेशीर ठरला नाही. त्यांच्या किरण साळेकरचा अपवाद वगळता इतर फलंदाजाना धावा जमवता न आल्याने बेनेटन क्रिकेट क्लबला मर्यादित १२३ धावांवर समाधान मानावे लागले. किरण साळेकरने ६१ धावांची अर्धशतकी खेळी करत संघाच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. योगेश पवारने १६ आणि अभिषेक श्रीवास्तवने नाबाद १४ धावा बनवल्या. बेनेटनच्या फलंदाजांवर अंकुश ठेवताना धृमील मटकरने ३, अंजदीप लाड, अमित पांडेय, हेमंत बुचडीने प्रत्येकी एक बळी मिळवला.उत्तरादाखल विजयाच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या गतविजेत्याना बेनेटनच्या गोलंदाजांनी चांगलेच सतावले. पण अतुल सिंग, विकी पाटील आणि अर्जुन शेट्टीने संयमी खेळी करत संघाला विजयी केले.अतुलने २८ तर विकी आणि अर्जुनने प्रत्येकी १९ धावा केल्या. या डावात सैफ खान, राहुल सोलकर आणि अभिषेक श्रीवास्तव प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.
संक्षिप्त धावफलक : बेनेटन क्रिकेट क्लब : २० षटकात ८ बाद १२३ ( किरण साळेकर ६१, योगेश पवार १६, अभिषेक श्रीवास्तव नाबाद १४, धृमील मटकर ४-२२-३, अंजदीप लाड ३.४-२७-१, अमेय पांडेय २.२-१५-१, हेमंत बुचडे २-१२-१ पराभूत विरुद्ध एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) : १९.३ षटकात ९ बाद १२४ ( अतुल सिंग २८, विकी पाटील १९, अर्जुन शेट्टी १९, सैफ खान ४-१७-२, राहुल सोलकर ४-२८-२ अभिषेक श्रीवास्तव ४-१९-२, रवी बुम्बाक २.३- २०-१, योगेश पवार ४-२८-१