शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Ekanth Shinde: 'सत्य लपत नाही, काळच उत्तर देत असतो'; एकनाथ शिंदेंवर केदार दिघेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 10:02 IST

शिवसेना ही संघर्षातून घडलेली संघटना आहे. दिघेसाहेबांनीही प्रचंड संघर्ष केला. आयुष्यभर एकनिष्ठ राहिले.

ठाणे - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाद आता दिवसेंदिवस विकोपाला जाताना दिसत आहे. त्यातच, आता शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरुन उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना रंगला आहे. एकीकडे संजय राऊत तुरुंगात गेल्यामुळे शिवसेनेचा किल्ला लढवण्यासाठी इतही सरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यातच, ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे थेट मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करत आहेत. आता, धनुष्यबाणावरुन सुरू असलेल्या लढाईदरम्यान, दिघेंनी एकनाथ शिंदेंवर कार्टुनच्या माध्यमातून टिका केली आहे.  

शिवसेना ही संघर्षातून घडलेली संघटना आहे. दिघेसाहेबांनीही प्रचंड संघर्ष केला. आयुष्यभर एकनिष्ठ राहिले. शेवटच्या श्वासापर्यंत भगवा सोडला नाही. तळागळातील कार्यकर्त्यांपर्यंत त्यांनी शिवसेना वाढवली. मला जिल्हाप्रमुखपद दिलंय, त्यातून प्रत्येक शिवसैनिकांपर्यंत पोहचण्याचं काम मी करणार आहे. शिवसेना ही कुणाची मक्तेदारी नाही अशा शब्दात ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यापूर्वी सुनावलं होतं. आता, एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवर टिका करताना त्यांनी ते दाखवत शिवसेना असले तरी त्यांचा खरा आरसा हा भाजपा असल्याचं म्हटलं आहे. निश्चितच जनता त्यांना आरसा दाखवेल, असेही त्यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे.  काहीजण म्हणतात आम्हीच खरे पण त्यावर काळ उत्तर देत असतो... सत्य लपत नाही. काळानुसार सत्य समोर येतेच... जो चुकतो त्याला समाजच आरसा दाखवतो!, अशा शब्दात केदार दिघेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, यासोबत एक कार्टुनही शेअर केले असून त्यामध्ये एकनाथ शिंदेंचा खरा चेहरा भाजपच असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

शिवसेना ही कुणाची मक्तेदारी नाही

केदार दिघेंनी यापूर्वीही म्हटले होते की, जेव्हा शिवसैनिकांची साथ असते तेव्हा कितीही मोठा संघर्ष असला तरी तो सोपा असतो. मला लहान वयात जिल्हाप्रमुख पद मिळालं आहे. माझ्यासारख्या तरूणाला हे पद मिळाल ते ज्येष्ठांच्या मार्गदर्शनामुळे आहे. शिवसेना ही कुणाची मक्तेदारी नाही. बाळासाहेबांमुळे आणि आनंद दिघेंमुळे शिवसेना ठाण्यात उभी राहिली आहे. बाळासाहेबांच्या विचारामुळे ही शिवसेना घडली आहे. कुणाचा फोटो झाकून न झाको शिवसैनिक विचारांवर ठाम आहे. शिवसैनिक हे विचार पुढे घेऊन जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा