शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
4
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
5
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
6
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
7
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
8
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
9
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
10
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
11
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
12
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
13
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
14
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
15
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
16
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
17
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
18
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
19
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
20
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'

मीरा भाईंदर मध्ये आठ गाईंना लंपीची लागण 

By धीरज परब | Updated: January 18, 2023 03:13 IST

महापालिकेच्या हद्दीत उत्तन येथे केशवसृष्टी आहे. तेथे मोठी गोशाळा आहे. त्या गोशाळेतील ८ गाईं मध्ये लंपीची लक्षणे दिसून आल्याने त्यांना अलगिकरण करून ठेवले आहे.

मीरारोड - मीरा भाईंदर शहरात आठ गाईंना लंपी चर्मरोगाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. महापालिकेने तात्काळ रोगराई पसरू नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे.

महापालिकेच्या हद्दीत उत्तन येथे केशवसृष्टी आहे. तेथे मोठी गोशाळा आहे. त्या गोशाळेतील ८ गाईं मध्ये लंपीची लक्षणे दिसून आल्याने त्यांना अलगिकरण करून ठेवले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी ठाणे व पालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी यांनी पाहणी केली आहे असे पालिके कडून सांगण्यात आले. 

गोशाळेचे डॉ सुशील अग्रवाल यांनी मात्र त्या ८ गायी लंपीच्या संशयित असून त्यांना वेगळे ठेवले आहे. अन्य गोवंशाची तपासणी केली गेली आहे असे सांगितले. 

लंपीची लागण झाल्याचे आढळून आल्याने महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी शहरात प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे आदेश जारी केले आहेत. गो जातीय प्रजाती ज्या ठिकाणी पाळले जातात त्या ठिकाणापासून अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई केली आहे.  जनावरे मोकाट सोडू नये. गोजातीय प्रजातीची बाधित असलेली जिवंत किवा मृत गुरे व म्हशी गोजातीय प्रजातींच्या कोणत्याही बाधित झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली असल्यास तसेच वैरण किंवा अन्य साहित्य अन्यत्र नेण्यास मनाई केली आहे. 

 रोगाचा प्रसार रोखण्यासाठी सीमा तपासणी नाक्यांवर काटेकोरपणे निर्देशांची अंमलबजावणी व कार्यवाही करावी. तसेच शहरातील गोपालक, पशुपालक, गोरक्षण संस्था व दुग्ध व्यवसायिक यांना देखील आदेश जारी करण्यात आले आहेत.

गोजातीय प्राणी बाजार भरवणे , शर्यती लावणे,  जत्रा भरवणे, प्रदर्शन आयोजित करणे तसेच त्यात बाधित गुरांना नेण्यास मनाई करण्यात आली आहे असे उपायुक्त रवी पवार यांनी सांगितले.   

टॅग्स :cowगायMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकLumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग