ईद-दीपावली स्नेहसंमेलन

By Admin | Updated: November 16, 2016 04:24 IST2016-11-16T04:24:58+5:302016-11-16T04:24:58+5:30

शीख धर्म हा ‘सिख’ म्हणजेच मूल्यावर आधारीत जीवनमानाचा विचार समाजापुढे ठेवतो. तुमचे जीवन तुम्ही असे जगा की तेच लोकांसमोर

Eid-Deepawali affection | ईद-दीपावली स्नेहसंमेलन

ईद-दीपावली स्नेहसंमेलन

ठाणे : शीख धर्म हा ‘सिख’ म्हणजेच मूल्यावर आधारीत जीवनमानाचा विचार समाजापुढे ठेवतो. तुमचे जीवन तुम्ही असे जगा की तेच लोकांसमोर एक उदाहरण किंवा सिख म्हणून राहिले पाहिजे. हा धर्म म्हणजे नुसती पगडी, दाढी नव्हे तर उच्च विचारसरणी आणि सेवाभावी वृत्ती स्वीकारून त्याप्रमाणे समर्पित जीवन जगण्याची शिकवण आपल्या अनुयायांना देतो’, असे शीख धर्माविषयीचे निरूपण प्रिन्स नागी यांनी केले.
समता विचार प्रसारक संस्थेच्या ईद-दीपावली स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. रविवारी गुरु नानक जयंतीचे औचित्य साधून आजच्या तरु ण मुलांना शीख धर्माबद्दल माहिती मिळावी या उद्देशाने नागी आणि सत्पाल सिंग यांच्याशी एकलव्य विद्यार्थ्यांचा संवाद आयोजित केला होता. पंकज गुरव आणि शहनाज शेख या दांपत्याच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. ‘ईद -दीपावली’चे संयोजन संस्थेचे कार्यकर्ते करण औताडे याने केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.

Web Title: Eid-Deepawali affection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.