शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नौपाडा पोलिसांच्या प्रयत्नांमुळे वृद्ध महिला स्वगृही परतली

By जितेंद्र कालेकर | Updated: March 27, 2019 22:13 IST

ठाण्याच्या सावरकरनगर येथून भरकटलेली ९० वर्षीय विजयमाला या वृद्ध महिलेला एका रिक्षा चालक महिलेने नौपाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी दुपारी आणले. पुढे सोशल मिडियाच्या आधारे पोलिसांनी तिच्या कुटूंबियांशी तिची भेट घडवून आणल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

ठळक मुद्देरिक्षा चालक महिलेने दिली माहितीसोशल मिडियाचा घेतला आधारअवघ्या सात तासात झाली कुटूंबियांची भेट

ठाणे : स्मृतीभ्रंश झाल्यामुळे सावरकरनगर येथून बेपत्ता झालेली ९० वर्षीय विजयमाला पुंडलिक नरिक ही वृद्ध महिला नौपाडा पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे मंगळवारी सहा ते सात तासांनी स्वगृही परतली. एका रिक्षा चालक महिलेला ती मिळाल्यानंतर सोशल मीडियाच्या मदतीने पोलिसांनी पत्ता शोधून तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.ठाण्यातील पाचपाखाडी येथील साईबाबा मंदिराजवळ दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विजयमाला एका रिक्षाने आली. पण तिला कुठे जायचे, कुठून आली, हे काहीच सांगता येत नव्हते. अखेर महिला रिक्षा चालक पूनम यांनी तिला नौपाडा पोलीस ठाण्यात आणले. तिथेही स्वत:चे नाव विजयमाला याव्यतिरिक्त पत्ता साईबाबा मंदिराजवळ इतकीच त्रोटक माहिती तिने दिली. कुटुंबीयांची तिला काहीच माहिती सांगता येत नव्हती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले, हवालदार शब्बीर फरास तसेच इतर कर्मचाऱ्यांनी पोलीस नियंत्रण कक्षात तिची ही माहिती दिली. सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर करुन विविध ग्रुपमध्ये ती पाठविली. ठाणे शहरातील साईबाबा मंदिर आणि आसपासच्या ठिकाणी अनेक माध्यमांच्या मदतीने चौकशी केली. अखेर पाच ते सहा तासांच्या प्रयत्नानंतर सावरकरनगर येथील तिच्या कुटुंबीयांची माहिती उपनिरीक्षक कपिले यांना मिळाली. त्यांनी ओळख पटविल्यानंतर या महिलेचा ७० वर्षीय मुलगा दिलीप नारिक (रा. भोलेनाथ, बि. नं. २, पाटीलवाडी, सावरकरनगर, ठाणे) यांनी नौपाडा पोलिसांशी संपर्क साधला. तोपर्यंत नौपाडा पोलिसांनी तिच्या जेवणाची सोय वगैरे केली. तिचे नातेवाईक तिला पुन्हा मिळाल्यानंतर या वृद्धेने आणि तिच्या नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानले..........................

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं