शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमधील पत्रीपूलाच्या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थ्यांनाही; शाळेला लागतोय लेटमार्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 17:00 IST

बालरोग तज्ज्ञ डॉ. मंगेश पाटे यांचे शिक्षण मंत्र्यांना ट्विट, गोंधळाचा त्रास विद्यार्थ्यांना का?

डोंबिवली: पत्रीपूलावरून सत्ताधारी, प्रशासन यांच्यातआरोप प्रत्यारोप सुरु असतांनाच आता त्या ठिकाणी होणा-या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थ्यांनाही बसत असल्याने त्यांची शाळा अनाठायी बुडत आहे. शाळेत जायला उशिर झाल्याने शाळा प्रशासन देखील विद्यार्थ्यांना शाळेत घेत नसल्याने पालक हैराण झाले आहेत. डोंबिवली एमआयडीसी मधील रहिवासी बालरोग तज्ज्ञ डॉ. मंगेश पाटे यांच्या पाल्यांना तसा अनुभव आल्याने त्रस्त पालकांनी थेट शिक्षणमंत्री आशिष शेलार यांना ट्विट लिहून गा-हाणे मांडले आहे.

गुरुवारी नेहमीप्रमाणे त्यांचा मुलगा कलयाणला शाळेत जायला सकाळी ७ वाजता घरातून निघाला, त्याला पत्रीपूलावर कोंडीला सामोरे जावे लागल्याने त्याला शाळेत जायला काहीसा उशिर झाला. शाळा सकाली ८ वाजून १० मिनिटांची असते, म्हणजे त्याला घरातून शाळेत जायला १ तासाहून अधिक वेळ लागला. त्यात त्या मुलांची चूक काय आहे? जर पत्रीपूलाचे काम वेळेत झाले, तेथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वीत झाली तर ही समस्या भेडसावणार नाही. त्यासाठी त्यांनी शेलार यांना ट्विट केले, तसेच पत्र लिहिल्याचे पाटे म्हणाले. विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी शाळा प्रशासनाचीही भेट घेत कोंडीच्या कारणाने काही लेट झाल तर मुलांना सूट द्यावी अशी विनंती केली, शाळा व्यवस्थापनानेही अडचण समजून घेतली, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. परंतु विद्यार्थ्यांनी अजून किती लवकर निघावे आणि शाळेत जावे? वाहतूक कोंडीत अडकल्याने मुलांच्या मानसीकतेवर परिणाम होतो, याचीही शिक्षणमंत्र्यांसह संबंधितांनी नोंद घ्यावी.

आमदार नरेंद्र पवार यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रीपूलाचे काम लष्कराकडे द्यावे अशी लेखी मागणी केली आहे, त्यामुळे तेथे समस्या भेडसावत आहेत हे वास्तव असल्याचे गांभिर्य ओळखून तातडीने उपाययोजना व्हाव्यात अशी अपेक्षा डॉ. पाटे यांनी व्यक्त केली. १० किमी अंतर कापण्यासाठी एवढा वेळ लागत आहे, हे योग्य नाही. एकीकडे वाहतूक कोंडी आणि दुसरीकडे शाळांचे काटेकोर नियम या कचाट्यात विद्यार्थी सापडले असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे चांगले नियोजन करून अरुंद पूलावरुन वाहतूक सुटसुटीत करण्यासाठी निदान आगामी काळात गांभीर्याने लक्ष घातल्यास विद्यार्थ्यांची शाळा अनाठायी बुडणार नाही. त्यामुळे पालकांना, पाल्यांना आणि शाळेलाही दिलासा मिळेल असेही ते म्हणाले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीSchoolशाळाStudentविद्यार्थीAshish Shelarआशीष शेलार