शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीच्या वाहतूक कोंडी आणि खाड्यांचा शिक्षण मंत्र्यांनाही झाला त्रास

By नितीन पंडित | Updated: November 19, 2022 20:30 IST

विशेष म्हणजे ठाण्याहून कशेळी ते काल्हेर मार्ग हा अवघ्या चार तर कशेळी ते अंजुरफाटा हा अंतर अवघ्या ९ ते १० किलोमीटरचा आहे.

भिवंडी - राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर भिवंडीतील काल्हेर येथील जि प शाळेत  माझी-ई-शाळा डिजिटल साक्षर मिशन या कार्यक्रमास वेळेवर त्यांना उपस्थिती राहायचे होते.मात्र भिवंडीतील वाहतूक कोंडी आणि खड्याच्या साम्राज्यामुळे ते वेळेवर पोहचू शकले नाही.त्यामुळे या खड्यांचा व वाहतूक कोंडीचा त्रास आज शिक्षण मंत्र्यांनाही झाला. त्यामुळे केसरकरांनी भाषणात भिवंडीतील वाहतूक कोंडीचा आणि खंड्याचा प्रश्न उपस्थित करून यामध्ये लवकर सुधारणा होण्याची गरज असून यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्र्याना या विषयी बोलणार असल्याचेही सांगितले. आमदार शांताराम मोरे यांनी देखील याकडे लक्ष द्यावे अशी सूचना देखील केसरकरांनी आमदार मोरेंना यावेळी केली.

विशेष म्हणजे ठाण्याहून कशेळी ते काल्हेर मार्ग हा अवघ्या चार तर कशेळी ते अंजुरफाटा हा अंतर अवघ्या ९ ते १० किलोमीटरचा आहे. मात्र गेल्या चार ते पाच वर्षापासून हा मार्गावर मोट्रोचे काम सुरु असल्याने खड्डे आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. सर्वच राजकीय पक्षासह विविध सामाजिक संघटनांनी वाहतूक कोंडी आणि खंड्याविषयी अनेक अंदोलन ,उपोषण धरणे, रस्ता रोको केलेत,मात्र सर्वांजनिक बांधकाम विभागाकडून थातुरमातुर खंड्याची दुरुस्ती करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी आणि खड्याची समस्या आजही जैसे थे असल्याने आज मंत्री केसरकरांना याचा फटका बसल्याने मुखमंत्र्यांच्या जिल्ह्यात जर वाहतूक कोंडीची अशी समस्या आहे.तर स्थानिक अधिकाऱ्यानेही या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची गरज असून आपण स्वतः मुख्यमंत्री शिंदेंकडे या विषयी बोलणार असल्याचे केसरकारांनी सांगितले.दरम्यान काल्हेर गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन स्वतः ही शाळा उभारून शिक्षणाचं महत्व पटल्याने मी गावकऱ्यांचे अभिनंदन करतो असे बोलून मंत्री केसरकर यांनी काल्हेर ग्रामस्थांचे कैतुक देखील केले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर