शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

राज ठाकरेंची ईडीकडून चौकशी: ठाण्यात जिल्हा अध्यक्षांसह २०२ जण पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 23:15 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसूली संचलनालयाने (ईडी) गुरुवारी चौकशीसाठी पाचारण केल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्यासह २०२ जणांना ताब्यात घेतले. तर २०४ जणांना १४९ अंतर्गत नोटीसा बजावल्या होत्या.

ठळक मुद्दे२०४ जणांना जणांना १४९ अंतर्गत बजावल्या नोटीसा ठाण्यातील भाजपच्या कार्यालयालाही दिले संरक्षण ठाण्यात अनेक ठिकाणी ठेवला पोलीस बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: सक्तवसूली संचलनालयाने (ईडी) महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसूली संचलनालयाने (ईडी) गुरुवारी चौकशीसाठी पाचारण केल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्यासह २०२ जणांना ताब्यात घेतले. तर २०४ जणांना १४९ अंतर्गत नोटीसा बजावल्या होत्या.नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना चौकशीसाठी पाचारण केल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातही कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने मनसेचे ठाणे- पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्यासह सुमारे २०२ जणांना ठाणे शहर पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयालाही राज्य राखीव दलाच्या तुकडीसह पोलिसांचे संरक्षण देण्यात आले होते. राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर ठाण्यात याआधीच मनसेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्र्त्यांनाही महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसूली संचलनालयाने (ईडी) गुरुवारी चौकशीसाठी पाचारण केल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्यासह २०२ जणांना ताब्यात घेतले. तर २०४ जणांना १४९ अंतर्गत नोटीसा बजावल्या होत्या. पोलीस कायदा १४९ अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस बजाण्याची कार्यवाही ठाणे शहर पोलिसांनी सुरु केली होती. त्यात बुधवारी राज यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याने आपण दुखावलो गेल्याचे आपल्या काही मित्रांना सांगत कळव्यातील प्रविण चौगुलेने या मनसेच्या कट्टर कार्यकर्त्याने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. तसेच २२ आॅगस्ट रोजी मनसेने ठाण्यात बंदची हाक दिली होती. अर्थांत, हा बंद नंतर राज यांच्या आवाहनानंतर लोकांना नाहक त्रास नको म्हणून मागेही घेण्यात आला होता. या सर्वच पार्श्वभूमीवर ठाण्यातही खबरदारीचा उपाय म्हणून तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन नये म्हणून कलम १४९ अंतर्गत मनसेचे ठाणे - पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव, प्रभाग अध्यक्ष जनार्दन खरीवले, शाखा अध्यक्ष विरेंद जोगळे, सागर महाराव आणि तुषार सावंत यांच्यासह २२ जणांना नौपाडा पोलिसांनी तर शहर अध्यक्ष रविंद्र मोरे आणि महिला उपशहर अध्यक्षा समीक्षा मार्र्कंडे आदींना कोपरी पोलिसांनी ताब्यात घेतले. संपूर्ण ठाणे आयुक्तालयात ठाणे शहर मधून ८४, भिवंडीतून४४, उल्हासनगरमधून ३२ तर वागळे इस्टेट परिमंडळामधून ४२ अशा २०२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय, कलम १४९ अंतर्गत भिवंडीतून ५५, कल्याणमधून ७८, उल्हासनगरमधून ७१ अशा २०४ जणांना नोटीसी बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.भाजप कार्यालयाला सशस्त्र पोलीस संरक्षणकोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी याआधी राजकीय पक्षांनी तसेच मनसेकडून राडा झालेल्या ठिकाणांवर पोलिसांनी गुरुवारी चोख बंदोबस्त ठेवला होता. यामध्ये ठाणे शहरातील तीन हात नाका, नितीन कंपनी, माजीवडा तसेच खोपट येथील भारतीय जनता पार्टीच्या ठाणे शहर जिल्हा कार्यालयालाही राज्य राखीव दलाच्या एका तुकडीसह सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण दिवसभरात कुठेही अनुचित घटना नोंद नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी ‘लोकमत’ला दिली. 

‘‘ मनसेने आधी पुकारलेल्या बंदच्या तसेच ईडीने राज ठाकरे यांना बजावलेल्या नोटीशीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्त क्षेत्रातील मनसेचे अविनाश जाधव यांच्यासह २०२ जणांना ताब्यात घेतले. तर २०४ जणांना १४९ अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे. संवेदनशील ठिकाणांसह भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या ठिकाणीही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ’’

विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय