शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वकिलाच्या घरात पहाटे चोरी, ‘पाटा’च्या हातात पडली बेडी; अट्टल चोराकडून दोन गुन्हे उघडकीस

By जितेंद्र कालेकर | Updated: February 21, 2024 20:57 IST

ठाणे : भिवंडीतील बोरपाडा भागातील रहिवासी अॅड. राजू खारीक (३९) यांच्या घरात चोरी करणाऱ्या संदीप सदानंद जाधव ऊर्फ पाटा ...

ठाणे : भिवंडीतील बोरपाडा भागातील रहिवासी अॅड. राजू खारीक (३९) यांच्या घरात चोरी करणाऱ्या संदीप सदानंद जाधव ऊर्फ पाटा (३०, रा. दुमाडा पाडा, कवाड, भिवंडी) याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी बुधवारी दिली. त्याला पुढील कारवाईसाठी भिवंडी तालुका पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

भिवंडीच्या बोरपाडा येथील रहिवासी खारीक यांच्या घराच्या मागील बाजूच्या पडवीतून चोरट्यांनी १७ जानेवारी २०२४ रोजी पहाटे ५ च्या सुमारास आत शिरकाव करून रोकड, मोबाईल तसेच बँकेचे एटीएम, पासबुक आणि चेकबुक असा २८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. 

याप्रकरणी भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. याच चोरीचा समांतर तपास करून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक भास्कर जाधव, उपनिरीक्षक महेश कदम, हवालदार प्रकाश साईल, संतोष सुर्वे, स्वप्नील बोडके यांच्या पथकाने कोणताही धागादोरा नसताना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी संदीप जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने या चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीतील ऐवज हस्तगत करण्यात येत असल्याचे ठाणे ग्रामीण पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसThiefचोर