शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

पावसाळ्यात सोनचाफा, मोगरा, जांभुळ, फणस वाढीवर राहणार भर!

By सुरेश लोखंडे | Updated: April 23, 2024 18:47 IST

खरीप पुर्व हंगाम नियोजन आढावा बैठक शिनगारे, यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पार पडली.

ठाणे : जिल्ह्यातील भात पिकाचे उत्पादन वार्डावणेसाठी सुधारीत वाणांसोबतच संकरित वाण वापरण्यासाठी शेतकऱ्यांमधे जनजागृती करून यंदाच्या पावसाळ्यात सोनचाफा व मोगरा या फुलपिकांचे तसेच जांभुळ व फणस या फळपिकांचे क्षेत्र विस्तारावर भर द्या, असे ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्याना मार्गदर्शन करून कृषी व कृषी संलग्न खरीप पूर्व हंगामाच्या नियाेजनाचा आढावा त्यांनी आज घेतला.   खरीप पुर्व हंगाम नियोजन आढावा बैठक शिनगारे, यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पार पडली. ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) छाया शिसोदे, अतिरिक्त साईओ डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दिपक कुटे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे आदीं अधिकारी, कर्मचारी उपस्थित हाेते. खरीप हंगामाच्या दृष्टीने जिल्हयातील प्रमुख पिकांचे तसेच पौष्टिक तृणधान्यांचे क्षेत्र व उत्पादकता वाढविण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. त्यासाठी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार बियाणे व खतांचा वेळेवर पुरवठा व्हावा यासाठी संबंधित निविष्ठा पुरवठादारांना शिनगारे यांनी निर्देश दिले.

 बियाणे व खतांच्या गुणनियंत्रणासाठी वेळेवर नमुने काढुन तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. शेतकऱ्यांकडुन प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे त्वरीत निराकरण करा,भात पिकाचे उत्पादन वार्डावणेसाठी सुधारीत वाणांसोबतच संकरित वाण वापरणेबाबत शेतक-यांमधे जनजागृती करणेच्या सुचना दिल्या. तसेच भात पिकाच्या शाश्वत उत्पादन वाढीकरीता सगुणा भात लागवड तंत्रज्ञान (SRT) पद्धतीचा जास्तीत जास्त क्षेत्रावर अवलंब करावा, शाश्वत उत्पादन व विषमुक्त अन्नधान्यासाठी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी या बैठकी मार्गदर्शन करण्यात आल.

तर बांबु लागवड पर्यावरण पुरक असल्याने जास्तीत जास्त क्षेत्रावर बांबु लागवड करा. सोनचाफा व मोगरा या फुलपिकांचे, जांभुळ व फणस या फळपिकांचे क्षेत्र विस्तारावर भर द्या, विविध राष्ट्रीयकृत, ग्रामीण सहकारी बँकांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा होण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक व संबंधित बैंक प्रतिनिधी यांना शिनगारे यांनी दिले.