दिवसभरात सर्प, विंचूदंशाचे ७ रुग्ण

By Admin | Updated: July 18, 2014 00:12 IST2014-07-18T00:12:42+5:302014-07-18T00:12:42+5:30

जंगलव्याप्त व दऱ्याखोऱ्यांच्या तालुक्यात सर्पदंश व विंचूदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे.

During the day, seven patients of snake, witchcraft | दिवसभरात सर्प, विंचूदंशाचे ७ रुग्ण

दिवसभरात सर्प, विंचूदंशाचे ७ रुग्ण

भातसानगर : जंगलव्याप्त व दऱ्याखोऱ्यांच्या तालुक्यात सर्पदंश व विंचूदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे.
गुरुवारी दुपारी २ वाजेपर्यंत उपजिल्हा रुग्णालयात तब्बल ७ रुग्ण दाखल झाले. कल्पेश निपुर्ते (२४, साखरोली) विंचूदंश, लहू भोईर (२३) विंचूदंश, रामचंद्र भांगरे (५७, बोरशेती, सर्पदंश), मंदा खोडका (२४) सर्पदंश, कल्पना विशे (२३, साठगाव) सर्पदंश, लहू भोईर (३५, आवरे) सर्पदंश. या सर्वांना उपचारार्थ दाखल केले तर यशवंत पेवारी यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठवण्यात आले. या वर्षी सर्पदंशाने एका १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. अशा घटना वारंवार होत असल्याने उपजिल्हा रुग्णालयात तातडीचे (आयसीयू) उपचार सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. (वार्ताहर)

Web Title: During the day, seven patients of snake, witchcraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.