शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

ठाण्यातून रिक्षाचे टायर चोरणाऱ्या दुकलीला अटक: ५ गुन्हे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 22:23 IST

ठाण्याच्या निर्जन भागात उभ्या असलेल्या रिक्षाचे टायर भल्या पहाटे चोरी करणाºया सलमान बर्डी आणि तन्वीर सिद्धीकी या भिवंडीतील दुकलीला चितळसर पोलिसांनी अटक केली आहे. रिक्षासह १३ टायरही त्यांच्याकडून जप्त केले आहेत.

ठळक मुद्देभिवंडीतून ठाण्यात रिक्षाने चोरीसाठी यायचेरिक्षासह एक लाख १५ हजारांचा ऐवज हस्तगतचितळसर पोलिसांची कारवाई

ठाणे : ठाण्यातील ठराविक ठिकाणी पार्र्किंग केलेल्या रिक्षांचे टायर चोरणा-या सलमान बर्डी (२६) आणि तन्वीर आलाम सिद्धीकी (२१, रा. दोघेही निजामपुरा, भिवंडी, ठाणे) दोघांना चितळसर पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. त्यांच्याकडून एका रिक्षासह एक लाख १५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.ठाण्याच्या वसंतविहार आणि गावंडबाग परिसरात उभ्या असलेल्या रिक्षांचे टायर गेल्या दोन महिन्यांपासून चोरीस जात होते. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात पाच ते सहा वेगवेगळे गुन्हेही दाखल झाले होते. सहायक पोलीस निरीक्षक प्रविण बनगोसावी, जमादार तुकराम बांगर, नाईक राजाराम जाधव आणि कॉन्स्टेबल मिलींअ देसले यांचे पथक रविवारी रात्रीच्या सुमारास गस्त घालीत असतांना त्यांना माजीवडा परिसरात सलमान हा रिक्षा चालक आणि त्याचा साथीदार तन्वीर हे दोघेही संशयास्पदरित्या फिरतांना आढळले. पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना अधिक ‘बोलते’ केल्यानंतर सलमानच्या रिक्षातून हे दोघेही अधूनमधून पहाटे १ ते ५ वाजण्याच्या सुमारास निर्जनस्थळी उभ्या असलेल्या रिक्षांचे टायर चोरी करीत असल्याची त्यांनी कबूली दिली. त्यांनी वसंतविहार परिसरातून दोन तर गावंडबाग भागातून तीन रिक्षांच्या टायरची चोरी केल्याचेही चौकशीत सांगितले. रात्री उभी केलेल्या रिक्षाचे सकाळी टायर गायब होण्याच्या घटनांमुळे रिक्षा चालकही हैराण झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बनगोसावी यांच्या पथकाने भिवंडीतील निजामपूरा येथील सलमानच्या घरातून रिक्षाचे १३ टायर तसेच चोरीसाठी वापरलेली रिक्षा असा एक लाख १५ हजारांचा ऐवज त्यांनी हस्तगत केला. घरात जमा केलेले हे टायर ते विक्री करण्याच्या बेतात असतांनाच पोलिसांनी त्यांची धरपकड केल्यामुळे त्यांच्याकडून हे पाचही गुन्हे उघडकीस आले. त्यांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाtheftचोरी