डम्परची बेस्ट बसला धडक

By Admin | Updated: June 2, 2017 05:36 IST2017-06-02T05:36:38+5:302017-06-02T05:36:38+5:30

भरधाव डम्परने बेस्ट बसला दिलेल्या धडकेत एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून चौघे जण किरकोळ जखमी झाले. मीरा रोड

Dumpster's Best Bus Stumble | डम्परची बेस्ट बसला धडक

डम्परची बेस्ट बसला धडक

लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : भरधाव डम्परने बेस्ट बसला दिलेल्या धडकेत एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून चौघे जण किरकोळ जखमी झाले. मीरा रोड पोलिसांनी डम्पर जप्त करून चालकास अटक केली.
मीरा रोड रेल्वे स्थानक येथून मच्छीमार वसाहत, माहीम येथे जाणारी बेस्टची सी-७१ ही बस आज गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास मीरा रोडच्या सिल्व्हर पार्क सिग्नलवरून जात होती. त्याच वेळी काशिमीऱ्याकडून भार्इंदरच्या दिशेने भरधाव आलेल्या डम्परने सिग्नल तोडून बेस्ट बसला जोरदार धडक दिली. यात रवींद्र म्हात्रे या प्रवाशाच्या डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले.
अन्य ४ प्रवाशांनाही किरकोळ दुखापत झाली. याप्रकरणी डम्पर ताब्यात घेऊन चालक मिराज शेख (रा. काशिमीरा) याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक जगदीश शिंदे यांनी दिली.

Web Title: Dumpster's Best Bus Stumble