शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाच्या अस्पष्ट भूमिकेमुळे मनसैनिक द्विधा मन:स्थितीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 00:55 IST

कल्याण-डोंबिवलीतील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता प्रचार नेमका कुणाचा करायचा, याबाबत द्विधा मन:स्थितीत आहेत

कल्याण : आपला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना विरोध आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे सभांमधून सांगत असल्याने कल्याण-डोंबिवलीतील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता प्रचार नेमका कुणाचा करायचा, याबाबत द्विधा मन:स्थितीत आहेत. मनसेतील जुन्या शिवसैनिकांचे मन राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करायला धजावत नाही आणि आगरी समाजातील मनसैनिक यांना जातीच्या आधारे राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडे ओढा असल्याने मनसेमध्ये दोन गट पडल्याची कबुली सूत्रांनी दिली आहे.लोकसभेच्या २००९ अथवा २०१४ च्या निवडणुकीत कल्याण मतदारसंघातून मनसेचे उमेदवार रिंगणात होते. लाखोंच्या आसपास मनसेला मते मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघात मनसेची लाखभर मते आहेत, हे नाकारून चालणार नाही. राज ठाकरे यांनी यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. मनसेचा प्रचार मोदी आणि शहांविरोधात असेल, असे राज यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, थेट कुणाचा प्रचार करा, असे त्यांनी सांगितले नसल्यानेच मनसैनिक आपापल्या सोयीनुसार कुणाचा प्रचार करायचा, याचा अर्थ लावत आहेत. त्याचबरोबर ठाकरे यांनी विधानसभेची तयारी सुरू करा, असेही सूचित केल्याने ते गणित डोळ्यांसमोर ठेवून मनसैनिक कुणाला पाठिंबा द्यायचा, याचे सोयीस्कर आराखडे तयार करत आहेत. ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात घेतलेल्या संदिग्ध भूमिकेमुळे कल्याण, डोंबिवलीतील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.दरम्यान, अलीकडेच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी मनसे १०० टक्केआमच्यासोबत आहे, असे वक्तव्य केले आहे. पाटील हे उमेदवारी अर्ज भरताना काढण्यात आलेल्या रॅलीत मनसेचे माजी परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे हे सहभागी झाले होते. अन्य कोणताही मनसेचा पदाधिकारी रॅलीत सहभागी नव्हता. पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून ते भूमिपुत्र असल्याच्या मुद्याकडे लक्ष वेधले जात आहे. त्यामुळे म्हात्रे यांची रॅलीतील उपस्थिती ही ‘भूमिपुत्र’ उमेदवाराला पाठिंबा या हेतूने असल्याची चर्चा झाली होती. मनसेचे कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष मनोज घरत यांनीही मोदी सरकार पाडण्यासाठी जेजे आवश्यक असेल, तेते सगळे केले जाईल, आम्ही मनसे स्टाइलने प्रचार करू, असे सूचक वक्तव्य केले आहे. आमच्या प्रचाराचा राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे, तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा नाही, असे स्पष्ट केल्याचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांचे म्हणणे आहे. ही मनसेमधील वेगवेगळी मते चर्चेचा विषय ठरली आहेत.मनसेमध्ये काही पदाधिकारी व कार्यकर्ते हे शिवसेनेतून आलेले आहेत. ते कट्टर हिंदुत्ववादी असल्याने त्यांचे मन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायला तयार नाही. त्यापैकी काही कल्याण मतदारसंघात भाजपचा उमेदवार नाही, अशी सोयीस्कर भूमिका घेत आहेत, तर आगरी समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोदीविरोधाबरोबरच समाजातील उमेदवार हा निकष लावत आहे.।मी कोणत्या समाजाचा आहे, हा भाग वेगळा, पण जेव्हा नेते स्पष्टपणे सांगतात, आपला प्रचार मोदी आणि शहा यांच्याविरोधात आहे, तेव्हा अप्रत्यक्षरीत्या का होईना दिलेल्या आदेशानुसार बाबाजी पाटील यांच्या रॅलीत सहभागी झालो होतो.- प्रल्हाद म्हात्रे, माजी परिवहन सदस्य, मनसे>मोदी आणि शहांविरोधात जे लढताहेत, त्यांना आमचा पाठिंबा असणार आहे. ज्यांना फायदा व्हायचा असेल त्यांना होऊ द्या, असे गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी सांगितले आहे. कल्याण लोकसभेत आम्ही मोदी आणि शहांच्या विरोधात प्रचार करणार, त्याचा फायदा बाबाजी पाटील यांना होणार, असे वक्तव्य मी केले आहे.- मनोज घरत, कल्याण ग्रामीण, विधानसभा अध्यक्ष>राज ठाकरे यांनी नांदेडच्या सभेत स्पष्टपणे भूमिका जाहीर केली आहे. मी कोणाच्या प्रचारासाठी आलेलो नाही. मोदी आणि शहा यांना विरोध म्हणून मी माझी स्वत:ची भूमिका मांडतोय, असे ठाकरे यांनी सांगितले आहे. त्याप्रमाणे आमची भूमिका राहील.- राजेश कदम, मनसे प्रदेश उपाध्यक्ष

टॅग्स :MNSमनसेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019