शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे प्राण

By अजित मांडके | Updated: March 1, 2023 22:15 IST

राबोडी पोलिसांची कामगिरी: पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली होती माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: राबोडी पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे गळफास घेतलेल्या तरुणाचे प्राण वाचू शकल्याची घटना मंगळवारी रात्री उघड  झाली आहे. ठाणे शहर पोलिस नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनंतर क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी जाऊन या विबोध दत्ताराम जाधव (२६, रा. अग्रसेन टॉवर, ठाणे) याचे प्राण वाचविणाºया राबोडी पोलिसांचे शहरात कौतुक होत आहे.

एरव्ही, चोरी, खून, दरोडा आणि आत्महत्येची घटना घडल्यानंतर पोलिस पोहचतात. त्यातनंतर चौकशी आणि तपास सुरु होतो. हे सर्वश्रुत आहे. परंतू, ठाणे शहर पोलिस नियंत्रण कक्षाने एक तरुण आत्महत्येच्या तयारीत असल्याची माहिती दिल्यानंतर वायूवेगाने जात या तरुणाला पोलिसांनी अक्षरश: मृत्यूच्या दारातून बाहेर काढले.  अगसेन टॉवरमधील पाचव्या मजल्यावरील ५०४ क्रमांकाच्या घरात विबोध हा तरुण आत्महत्या करीत असल्याची माहिती ठाणे शहर पोलिस नियंत्रण कक्षाला २७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता सुमारास मिळाली होती. नियंत्रण कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी हीच माहिती तातडीने राबोडी पोलिसांना दिली. त्यानुसार रात्र पाळीतील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस हवालदार तडवी, पोलिस नाईक  पाटील, अंमलदार घडशी आणि बिट मार्शल अंमलदार यादव आणि पाटील हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. 

तेंव्हा घराला आतून कडी लावलेली आढळली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिस पथकाने आजूबाजूच्या  रहिवाशांकडे विचारपूस करीत या सदनिकेची चावी मिळविली. तातडीने त्यांनी या घराचा दरवाजा उघडला. तेंव्हा विबोध हा पंख्याला फास लावून घेत असल्याचे आढळले. त्याला त्यांनी तातडीने खाली घेऊन त्याच्या गळ्यातील दोरी काढली. त्यानंतर त्याच्या वडिलांना ही माहिती देण्यात आली. त्याचे वडिल हे सत्संगाला तर आई मुंबई येथे नोकरीनिमित्त बाहेर गेल्याचे त्याने सांगितले.  वडीलही तातडीने घरी पोहचले. त्यानंतर या प्रकाराची माहिती देऊन मुलाला  वडिलांच्या ताब्यात दिल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी  सांगितले. तत्परतेने घटनास्थळी जाऊन या तरुणाचे प्राण वाचविणाऱ्या पोलिस पथकाचे घाटेकर यांच्यासह परिसरातील रहिवाशांनी कौतुक केले.  या घटनेचा व्हिडिओ २८ फेब्रुवारी रोजी आणि १ मार्च रोजी व्हायरल झाला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस