शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लूूमुळे पालिका रुग्णालयात विशेष कक्ष सुरू करा, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 04:28 IST

बदलापूर पश्चिमेतील हेंद्रेपाडा भागातील मोहन तुलसी विहार संकुलात एका महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलेसोबत कुटुंबातील आणखी तिघांना याची लागण झाली आहे.

बदलापूर  - बदलापूर पश्चिमेतील हेंद्रेपाडा भागातील मोहन तुलसी विहार संकुलात एका महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलेसोबत कुटुंबातील आणखी तिघांना याची लागण झाली आहे. त्यामुळे स्वाइन फ्लू, डेंग्यूसारख्या आजारांसाठी कुळगाव-बदलापूरच्या पालिका रुग्णालयात विशेष कक्ष उभारण्याची मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. तसेच पालिका क्षेत्रातील डॉक्टरांनी सर्वेक्षणाचे काम करण्याची मागणी केली आहे.हेंद्रेपाडा भागातील मोहन तुलसी विहार येथील लक्ष्मी कोहार (६२) या काही दिवसांपासून आजारी होत्या. ताप असल्याने त्यांच्यावर बदलापूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान गेल्या शुक्र वारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूआधी घेण्यात आलेल्या रक्ताच्या नमुन्याचा अहवाल आल्यानंतर त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे.त्यांच्यापाठोपाठ कुटुंबातील इतर तिघांनाही स्वाइनसदृश आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर बदलापुरातच उपचार सुरू आहेत.याबाबत, कुळगाव-बदलापूर नगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांना विचारले असता, त्या महिलेला स्वाइन फ्लू झाल्याचे सांगतानाच त्यांना इतर आजारांनीही ग्रासले होते, असे सांगितले. तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर तिघांनाही स्वाइन फ्लूसदृश तापाची लागण झाल्याचेही समोर आले होते. त्यांची प्रकृती सध्या बरी असून त्यातील एका सदस्याला घरीही सोडण्यात आले आहे.मात्र, स्वाईन फ्लूचे रुग्ण समोर आल्यानंतर आता पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.खाजगी रुग्णालयांमध्ये असलेल्या स्वाइन फ्लू, डेंग्यू, मलेरिया आणि इतर संसर्गजन्य रुग्णांची माहिती पालिकेकडे मिळत नाही. त्यामुळे अशाप्रकारचा विशेष कक्ष उभारण्याची मागणी राष्टÑवादीकडून करण्यात येत आहे.पालिकेच्या दफ्तरी अशी नोंद राहण्यासाठी आणि अशा रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यासाठी पालिकेच्या दुबे रुग्णालयात विशेष कक्ष उभारण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.तसेच मच्छरांच्या वाढलेल्या उच्छादावरही तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.पदोन्नतीतून भरल्या जाव्यात, असा नियम आहे. मात्र या अधिकाऱ्यांची प्रस्तावाअभावी निवड होत नसल्याने वर्षानुवर्षे कोटा पूर्ण केला जात नाही.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूbadlapurबदलापूर