शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

नियम तफावतमुळे जि. प.च्या शाळांसाठी राज्यातील १३४२ अतिरिक्त शिक्षकांची नाराजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 7:07 PM

शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये (इयत्ता १ ली ते ५ वी ) आठ हजार २६१ जागा रिक्त असून अतिरिक्त शिक्षकांची संख्या फक्त एक हजार ३४२ आहे. उच्च प्राथमिक (६ वी ते ८ वी) शाळांमध्ये चौदा हजार ९९५ जागा रिक्त असून अतिरिक्त शिक्षकांची संख्या अवघी ८०९ आहे. तर माध्यमिक (९ वी व १० वी) शाळांमध्ये १७९ जागा रिक्त असून अतिरिक्त शिक्षकांची संख्या मात्र २३८ आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये २६५ जागा रिक्त असून अतिरिक्त शिक्षकांची संख्या ११० आहे. तर उच्च प्राथमिक शाळांमध्ये ५२३ जागा रिक्त असून अतिरिक्त शिक्षकांची संख्या अवघी २५ एवढी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांमध्ये मात्र एकही जागा रिक्त नसून अतिरिक्त शिक्षकांची संख्या केवळ दोन असल्याचे डुंबरे यांनी अहवालावरून स्पष्ट केले.

ठळक मुद्देसेवा कालावधीतील सोयी, सुविधा, सवलती आदींमध्ये मोठ्याप्रमाणात तफावतराज्यातील सुमारे १३४२ अतिरिक्त शिक्षकांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतील समावेशाच्या विरोधात तीव्र नाराजीसमायोजन झालेल्या दिनांकापासून तीन वर्षापर्यंत मूळच्या शाळेत पद निर्माण न झाल्यास या शिक्षकांचे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येच कायमचे समायोजन होईलसमायोजित होईपर्यंतचा कालावधी माझ्या सेवेतील खंड समजण्यात येईल, याची मला कल्पना आहे’ असेही अतिरिक्त शिक्षकांकडून संमतीपत्र लिहून घेतले जात असून ते अन्यायकारक

ठाणे : खाजगी शाळांमधील शिक्षकांच्या सेवेचा कायदा (एमईपीएस अ‍ॅक्ट) व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा कायदा (झेडपी अ‍ॅक्ट) वेगवेगळा आहे. सेवा कालावधीतील सोयी, सुविधा, सवलती आदींमध्ये मोठ्याप्रमाणात तफावत आहे. यामुळे राज्यातील सुमारे १३४२ अतिरिक्त शिक्षकांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतील समावेशाच्या विरोधात तीव्र नाराजी असल्याचे शिक्षक सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष दिलीप डुंबरे यांनी सांगितले.शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या आदेशास अनुसरून राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये खाजगी शाळांमधील सुमारे एक हजार ३४२ अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्याची कारवाई सुरू झाली. मात्र या अतिरिक्त शिक्षकांकडून ‘ माझे जिल्हा परिषद शाळांमध्ये समायोजन करण्यास माझी संमती आहे किंवा संमती नाही’ असे लिहून घेतले जात आहे. याशिवाय जे शिक्षक संमती देणार नाहीत; त्यांच्याकडून ‘अतिरिक्त ठरल्याच्या दिनांकापासून पुन्हा समायोजित होईपर्यंतचा कालावधी माझ्या सेवेतील खंड समजण्यात येईल, याची मला कल्पना आहे’ असेही अतिरिक्त शिक्षकांकडून संमतीपत्र लिहून घेतले जात असून ते अन्यायकारक असल्याचे डुंबरे यांनी सांगितले.सुरूवातीला होणाऱ्या या नियुक्त्या प्रतिनियुक्तीने म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात असणार आहेत. समायोजन झाल्यानंतर जर मूळच्या शाळेत पदनिर्मिती झाली तर अशा शिक्षकांना परत मूळ शाळेत पाठवण्यात येईल. परंतु समायोजन झालेल्या दिनांकापासून तीन वर्षापर्यंत मूळच्या शाळेत पद निर्माण न झाल्यास या शिक्षकांचे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येच कायमचे समायोजन होईल. पण खाजगी शाळांमधील शिक्षकांच्या सेवेचा कायदा व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा कायदा वेगवेगळा असल्याने प्रतिनियुक्तीने समायोजन झालेल्या शिक्षकांच्या नियंत्रणाचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती शिक्षक डुंबरे यांनी व्यक्त केली.शासनाच्या या निर्णयामुळे खाजगी शाळांमधील शिक्षकांना जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर पालिकांच्या शाळांमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार असली तरी या शिक्षकांचे समायोजन करताने महिला, अपंग व वयाने जास्त असलेल्या शिक्षकांचा सहानुभूतीने विचार करून त्यांच्या निवासा जवळच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात यावे. अशी मागणी शिक्षक सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष दिलीप डुंबरे यांनी केली आहे. शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये (इयत्ता १ ली ते ५ वी ) आठ हजार २६१ जागा रिक्त असून अतिरिक्त शिक्षकांची संख्या फक्त एक हजार ३४२ आहे. उच्च प्राथमिक (६ वी ते ८ वी) शाळांमध्ये चौदा हजार ९९५ जागा रिक्त असून अतिरिक्त शिक्षकांची संख्या अवघी ८०९ आहे. तर माध्यमिक (९ वी व १० वी) शाळांमध्ये १७९ जागा रिक्त असून अतिरिक्त शिक्षकांची संख्या मात्र २३८ आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये २६५ जागा रिक्त असून अतिरिक्त शिक्षकांची संख्या ११० आहे. तर उच्च प्राथमिक शाळांमध्ये ५२३ जागा रिक्त असून अतिरिक्त शिक्षकांची संख्या अवघी २५ एवढी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांमध्ये मात्र एकही जागा रिक्त नसून अतिरिक्त शिक्षकांची संख्या केवळ दोन असल्याचे डुंबरे यांनी अहवालावरून स्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणेTeacherशिक्षक