शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

नियमबाह्य कामे रोखल्याने झाला आयुक्त गीतेंचा घात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 2:57 AM

पालिका निवडणुकीआधी वर्षभर आयुक्त डॉ. नरेश गीते यांना फारसा विरोध न करणा-या भाजपाने दालने बंद ठेवत त्यांच्याविरूद्ध मोहीम उघडल्याने आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना मध्यस्थी करायला लावून त्यांची उचलबांगडी केल्याचे आरोप सुरू झाल्याने या विषयावर त्या पक्षाची पुरती कोंडी झाली आहे.

मीरा रोड : पालिका निवडणुकीआधी वर्षभर आयुक्त डॉ. नरेश गीते यांना फारसा विरोध न करणा-या भाजपाने दालने बंद ठेवत त्यांच्याविरूद्ध मोहीम उघडल्याने आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना मध्यस्थी करायला लावून त्यांची उचलबांगडी केल्याचे आरोप सुरू झाल्याने या विषयावर त्या पक्षाची पुरती कोंडी झाली आहे. नियमबाह्य कामांना विरोध, कायद्यात न बसणारे ठराव मंजूर झाल्यानंतर तेही सरकारकडे विखंडनासाठी पाठवल्यानेच त्यांची बदली झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.सलग तीन आयएएस अधिकारी पालिकेत न टिकल्याने आणि आताही अशा अधिकाºयाऐवजी पदोन्नतीतील अधिकाºयाची नेमणूक करण्याचा आग्रह धरण्यात आला होता. पण तो डावलून मुख्यमंत्र्यांनी आयएएस अधिकारी दिला. त्यामुळे मीरा-भार्इंदरमधील राजकीय परिस्थितीचेच आव्हान नव्या अधिकाºयाला पेलावे लागण्याची चिन्हे आहेत.पालिका निवडणुकीपूर्वी मावळते आयुक्त गीते यांच्याशी जुळवून घेणाºया आमदार नरेंद्र मेहता यांनी निवडणुकीत एकहाती सत्ता मिळताच आयुक्तांना हटवण्यासाठी उघडपणे निर्णायक आघाडी उघडली. यामागे प्रस्तावित विकास आराखड्यातील घोळ, बिल्डर लॉबीच्या आवळलेल्या नाड्या, काटेकोर अर्थसंकल्पाची तयारी, प्रशासकीय कामकाजातील चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी घेतलली कठोर भूमिका आदी अनेक कारणे असल्याची चर्चा सुरू आहे. मेहता समर्थकांनी मात्र आयुक्तांची निर्णय दिरंगाई, ठरावांवर न केली जाणारी अमलबजावणी आदी कारणे त्यांना भोवल्याचे म्हटले आहे. मेहतांबाबत पोकळ अफवा पसरवण्यात आल्या. उलट शहर विकासासाठी प्रशासनाचा कारभार गतीमान व्हावा, अशीच मेहतांची भूमिका आहे. त्यांनी त्यांच्या कंपनीचा एकही प्रस्ताव दिलेला नाही. अतिक्रमण तोडणे, फेरीवाले हटवणे आदी कामे झालेली नाहीत. ठरावांवर अंमलबजावणी न झाल्याने पालिकेचे उत्पन्न रोडावले. विकासकामांना खीळ बसल्याचा दावा भाजपाच्या सूत्रांनी केला.वादग्रस्त ठरलेले पण आ. मेहतांच्या मर्जीतील आयुक्त अच्युत हांगे यांची उचलबांगडी झाल्यानंतर पालिका आयुक्तपदी बालाजी खतगावकर, गणेश देशमुख आदींसाठी आग्रह धरला जात होता. पण आॅगस्ट २०१६ मध्ये डॉ. नरेश गीते यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यांनी पदभार स्वीकारला, तेव्हा भाजपाच शिवसेनेसोबत सत्तेत होती आणि भाजपाच्या गीता जैन महापौर होत्या. तेव्हा जैन यांचे आयुक्तांशी पटत नसले, तरी आयुक्तांच्या कार्यपध्दतीवर मेहतांनी जाहीरपणे विरोधाची भूमिका घेतली नव्हती. पण पालिकेत एकहाती सत्ता आल्यानंतर मात्र नियम-कायद्यात न बसणारे अनेक ठराव बहुमताने मंदूर झाले. त्याच्या अंमलबजावणीचा आग्रह सुरू झाला. प्रशासकीय कामाकाजवर पकड निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु झाले. भाजपाच्या एकछत्री वर्चस्वामुळे पालिकेचे अधिकारी व कर्मचारी ‘होयबा’ होऊ लागले. कोणती अनधिकृत बांधकामे तोडायची हे ठरवण्यापासून रस्ता रुंदीकरणापर्यंत सर्वत्र हस्तक्षेपाचा प्रयत्न सुरू झाल्याने वेगवेगळी कारणे पुढे करत संघर्ष होऊ लागला.भाजपा नगरसेविका मीना कांगणे यांचे पती माजी नगरसेवक यशवंत कांगणे यांनी ‘साई गेस्ट हाऊस’ या बेकायदा लॉजचे पुन्हा बांधकाम केल्याने पालिकेने ते १९ जाानेवारीला तोडायला घेतले. त्याच वेळी आयुक्तांच्या निषेधार्थ महापौर, उपमहापौर, विविध सभापतींनी आपली पालिकेतील दालने बंद केली. पण त्यासाठी वेगळे कारण पुढे केले. लगेचच परिवहन कर्मचारी, संगणक चालकांचा संप झाला. आयुक्तांची चोहोबाजूने कोंडी सुरू झाली.पालिकेचा विकास आराखडा आ. मेहतांचे निकटवर्ती नगररचनाकार दिलीप घेवारे यांनी तयार केला, पण त्यावर राजकीय छाप असल्याची चर्चा सुरू असतानाच आयुक्तांनी त्याची फेरपडताळणी करण्याचा पवित्रा घेतला होता. बांधकाम परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेची चेकलिस्ट तयार केल्याने बिल्डरांना चाप बसला. पालिकेला देय असलेल्या जागा आधी पालिकेच्या नावे करुन ताब्यात देण्यास बजावल्याने बिल्डर लॉबी हादरली होती. नवे बांधकाम नकाशे मंजूर होत नव्हते. निविदांच्या दरातही त्यांनी कपात करायला लावली होती. त्यानंतर पुन्हा हांगे यांना आयुक्तपदी आणण्याचे प्रयत्न सुरू झाले, पण त्याला मुख्यमंत्र्यांकडून नकार मिळाला. त्यामुळे पुन्हा खतगावकर किंवा देशमुख यांच्यासाठी प्रयत्न सुरू झाले. परंतु मुख्यमंत्री सनदी अधिकाºयावर ठाम राहिल्याने अखेर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून बी. जी. पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.>शिवसेनेचा ठिय्या : भार्इंदर : आमदार नरेंद्र मेहता यांच्या तक्रारीवरूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका आयुक्तांची तडकाफडकी बदली केल्याचा आरोप करून त्याविरोधात शिवसेनेच्या नगरसेवकांनी मंगळवारी महापौर दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करून आदेशाच्या प्रतींची होळी केली. मेहता यांच्या मर्जीनुसार त्यांच्या समक्ष सोमवारी आयुक्तांच्या बदलीचा आदेश मुख्यमंत्र्यांनी काढला. हाच का पारदर्शकपणा, असा टोलाही शिवसेनेने लगावला.>काँग्रेस देणार मुख्यमंत्र्यांना पत्रआयुक्तांच्या बदलीचा निषेध करत ती आक्षेपार्ह असल्याचे काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार यांनी म्हटले आहे. सत्ताधाºयांची टक्केवारी बंद झाल्यानेच त्यांनी आयुक्तांविरोधात बदलीचे षड्यंत्र रचले. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसह जनमताचा कौल पाहून ही बदली रद्द करावी, असे पत्र मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.>‘बदलीची मागणीकेली नव्हती’बांधकाम परवानग्यांशी आमचा काही संबंध नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आयुक्तांच्या बदलीची मागणी केलेलीच नाही. उलट आयुक्तांनी विकासकामे खोळंबून ठेवल्याने ती सुरु करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती, असे आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितले.

टॅग्स :mira roadमीरा रोड