शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण बदलामुळे दिव्यातील खेळाच्या मैदानाचा जाणार बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 01:41 IST

दिवा रेल्वे स्थानकाजवळील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित भूखंडाचा ठाणे महापालिकेने प्रस्तावित केलेल्या २० मीटर रुंद रस्त्यासह प्राथमिक शाळेकरीता बळी जाणार आहे.

- नारायण जाधव ठाणे : दिवा रेल्वे स्थानकाजवळील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित भूखंडाचा ठाणे महापालिकेने प्रस्तावित केलेल्या २० मीटर रुंद रस्त्यासह प्राथमिक शाळेकरीता बळी जाणार आहे. याबाबतच्या आरक्षण बदलास राज्याच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली असून दिवा येथील पार्किंगसह खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर नव्याने २० मीटर, १० मीटर रुंदीचे दोन नवीन रस्ते, प्राथमिक शाळा, निवासी भाग आणि रेल्वेच्या वापराकरीता आरक्षण बदलाकरीता नागरिकांकडून आता हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.दिवा परिसराचा झपाट्याने विकास होत असून येथील लोकसंख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यानुसार रस्ते अपुरे पडू लागले असून त्याकरीता आता मैदानाचा बळी देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. नव्या प्रस्तावानुसार खेळाच्या मैदानाचे आरक्षण पूर्णत: नामशेष होणार असल्याने त्यास स्थानिक खेळांडूकडून विरोध होण्याची शक्यता आहे.>एक महिन्यात हरकती नोंदवामहापालिकेच्या आरक्षण बदलाच्या प्रस्तावावर राज्याच्या नगररचना संचालकांनी एक महिन्याच्या ठाणेकरांकडून एक महिन्याच्या हरकती व सूचना मागविल्या आहेत. या प्रस्तावानुसार खेळाचे मैदानाचे आरक्षण पूर्णत: नामशेष होणार आहे. याबाबतचे नकाशे व फेरबदल प्रस्ताव ठाणे महापालिका आयुक्त कार्यालय, नगररचना उप संचालक कोकण भवन, नवी मुंबई आणि सहाय्यक संचालक जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे उपलब्ध केले आहेत.>असा आहे महापालिकेचा प्रस्तावसध्या दिवा रेल्वे स्थानकानजिकचे क्षेत्र पार्किंग, खेळाचे मैदान आणि विकास योजनेतील २० आणि १० मीटर रुंद रस्त्यांकरीता ं आणि काही भाग निवासी क्षेत्राकरीता आरक्षित आहे. मात्र, नव्या प्रस्तावानुसार या ठिकाणी २० मीटर रस्त्याची आखणी करण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे बाधीत होणारे सध्याच्या आरक्षणातील पार्किंग व खेळाचे मैदानाचे क्षेत्र एकत्र करून १० मीटर रस्त्यासह पार्किंगकरीता आरक्षित करण्याचा प्रस्ताव आहे. तर २० मीटर रस्त्याच्या उत्तरेकडील उरलेले क्षेत्र निवासी भागाकरिता तसेच खेळाच्या मैदानासाठी आरक्षित भूखंडासह १० मीटर रस्त्याखालील क्षेत्र प्राथमिक शाळेकरिता आरक्षित करण्याचे ठरविले आहे. तर २० मीटर रुंद रस्ता वगळता उरलेले क्षेत्र रेल्वेस देण्यात येणार आहे. या आरक्षण बदलामुळे सध्याच्या आरक्षणातील खेळाचे मैदान पूर्णत: नामशेष होणार आहे. रेल्वेस जागा देण्यापेक्षा त्यांना दिल्या जाणाऱ्या भूखंडावर मैदानाचे आरक्षण ठेवावे, असा काहींचा सूर आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका