शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कट रचून माझ्या मुलाचा अपघात घडवून आणल्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 04:47 IST

वडिलांचा आरोप : न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे, बसचालकावर व्यक्त केला संशय

अंबरनाथ : येथील म्हाडा कॉलनी परिसरातील एमआयडीसी रोडवर दुपारी एका बसच्या धडकेत कॉलेजमधील दोघा तरुणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी बस चालकावर संशय व्यक्त करून या प्रकरणी तपास करण्याची मागणी मृत तरूणाच्या वडिलांनी केली होती. मात्र या प्रकरणात तपास केला जात नसल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली आहे.

२६ आॅक्टोबर २०१८ मध्ये दुपारी सव्वा वाजता दीपक मानवतकर यांचा १८ वर्षाचा मुलगा तेजेश मानवतकर हा आपला मित्र चंद्रशेखर कुशवाह याच्यासोबत साऊथ इंडियन कॉलेजमधून परीक्षा देऊन घरी परतत होता. यावेळी म्हाडा कॉलनीजवळ त्यांची दुचाकी आली असता एका भरधाव बसने त्यांना मागून धडक दिली. यावेळी बस रिकामी होती. अपघातात दोघे तरूण बसखाली आल्याचे लक्षात येताच बसचा चालक जयवंत पवार याने पळ काढला. या अपघातात जखमी झालेला तेजेश आणि चंद्रशेखर या दोघांचाही मृत्यू झाला. या अपघातानंतर बसच्या चालकाला पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला जामिनावर सोडण्यात आले. तर काही दिवसातच अपघातग्रस्त बसही सोडून देण्यात आली. मात्र या प्रकणरात तेजेश यांचे वडील दीपक यांनी बस चालकावर संशय व्यक्त केला आहे.

कट रचून हा अपघात घडविल्याचा त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. अपघाताच्यावेळी दुचाकीला जी धडक बसली ती बसच्या उजव्या बाजूने बसली. यावरुन स्पष्ट होते की बसचालक ज्या बाजूला बसला होता त्याच बाजूने धडक बसल्याने हा प्रकार जाणूनबुजून केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. अपघातानंतर दोन्ही मुले जिवंत असतानाही बस चालकाने त्यांना रूग्णालयात न नेता घटनास्थळावरून पळ काढला. त्याने या मुलांना रूग्णालाात हलविले असते तर त्यांचा जीव वाचला असता असेही या तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणात बसचालकाची चौकशी केल्यास नेमका हा कट का रचण्यात आला याची माहिती पुढे येऊ शकते असे तक्रारीत नमूद केले आहे. या अपघाताची चौकशी केल्यास हा सर्व प्रकार कट रचून केल्याचे समोर येईल असे मानवतकर यांनी स्पष्टकेले. आपल्या तक्रारीची दखलच घेतली जात नाही म्हणून मानवतकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली आहे. मुख्यमंत्री कुठला निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.संघर्ष सुरूच राहणारमानवतकर हे दिव्यांग असून तेजेश हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. आमच्या जगण्याची उमेदच निघून गेली आहे. मात्र मुलाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना योग्य शिक्षा देण्यासाठी आपला संघर्ष सुरु राहील, असे मानवतकर यांनी स्पष्ट केले. सरकार न्याय देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघातMurderखून