शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
2
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
4
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
5
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
6
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!
7
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
8
ICC Womens World Cup 2025 : युवराज सिंगच्या साक्षीनं हरमनप्रीत कौरनं दिला शब्द; आम्ही...
9
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
10
‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला   
11
AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम
12
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
13
आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS
14
VIDEO: महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
15
Viral Video: मध्यरात्री शौचालयासाठी बाहेर पडला, अचानक समोर दिसला बिबट्या, पहारेकरीसोबत असं घडलं की...
16
‘माझी पत्नी बाहेरच्या लोकांना घरी बोलावते’, व्हिडीओमध्ये सांगून पतीनं उचललं भयानक पाऊल...  
17
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
18
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
19
Gold Silver Price 11 August: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
20
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  

अधिक मोबदल्यामुळे दारूभट्टीच्या व्यवसायात परप्रांतीयांचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 05:56 IST

नवी आरोग्यास अपायकारक असलेल्या देशी (गावठी) दारु प्याल्यामुळे मागील काही वर्षांमध्ये मुंबईतील विविध भागांमध्ये शेकडो

नवी आरोग्यास अपायकारक असलेल्या देशी (गावठी) दारु प्याल्यामुळे मागील काही वर्षांमध्ये मुंबईतील विविध भागांमध्ये शेकडो जणांचा बळी गेला आहे. यामुळे राज्य सरकारने या दारूची निर्मिती आणि विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र यानंतरही सर्रासपणे ती तयार करु न तीची विक्र ी होत आहे. ती प्रामुख्याने मानवी वसाहतीपासून दूर असलेल्या निर्जनस्थळी बनवली जाते. पूर्वी दिव्यासारख्या शहरातील शेतामध्ये ती तयार करण्यासाठी भट्ट्या लावल्या जात होत्या. परंतु मागील काही वर्षात तेथे मोठ्या प्रमाणावर वसाहती निर्माण झाल्या आहेत. यामुळे तेथील शेतजमीनींना सोन्याचा भाव आल्याने आता भट्ट्या येथील म्हातार्डी, बेतवडे, आगासन तसेच डोंबिवली-कल्याण रोड जवळील छोटी आणि मोठी देसाई याचप्रमाणे पडले गावातील खाडीकिनारे आणि मध्यभागी असलेल्या बेटावर तसेच खाडीच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या झाडाझुडपांमध्ये लावल्या जातात. ती तयार करण्यासाठी प्रथम कच्चे रसायन(वाँश) तयार केले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने मानवी शरीरास घातक असा बिब्बा, नवसागर, सडका गूळ,घाणीचे पाणी याचा वापर केला जातो. पूर्वी दारू तयार करण्यापासून ती विकण्यापर्यंत एका विशिष्ट समाजाचा वरचष्मा होता. मात्र मागील काही वर्षात जमिन विक्रीतून गडगंज पैसा मिळाल्यामुळे तसेच सातत्याने होत असलेल्या कारवाईमुळे त्या समाजातील स्थानिक आता भट्टी लावण्यासाठी स्वत: पुढे न येता दाक्षिणात्य, परप्रांतीय यांना पुढे करून त्यांच्या मार्फत भट्ट्या लावतत. थोड्या गुंतवणुकीमध्ये अधिक मोबदला मिळवून देणाऱ्या या जीवघेण्या कथित व्यवसायात यामुळे परप्रांतीय आता मोठ्या प्रमाणावर दिसू लागले आहेत. दारू तयार करण्यपासून ते किरकोळ विक्रेत्यां पर्यत ती पोहचविण्याचे काम ही परप्रांतीय मंडळीच करतात. एका ट्यूबमध्ये २० ते २५ लिटर तयार दारु भरली जाते. मुंबई तसेच उपनगरातील विक्रेत्यांपर्यत पूर्वी ती लोकलमधून पोहचवली जायची. परंतु बंदी नंतर लोकलमधून वाहतूक करताना पकडले जाण्याचा धोका वाढल्यामुळे गेल्या काही वर्षांत लोकलऐवजी आता तयार दारूची वाहतूक करण्यासाठी आलिशान वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तयार झालेली दारू किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहचवणारा (पासिंगवाला) ती ताब्यात घेण्यापूर्वी दुधाप्रमाणे ती किती डिग्रीची (किती कडक आहे) आहे हे तपासून नंतर ताब्यात घेतो. देशी दारू जेथे तयार केली जाते त्या हाटभट्ट्यावर पोलीस सातत्याने कारवाई करतात. या दारूचा वापर निवडणुकांमध्ये वाढण्याच्या शक्यतेमुळे अलिकडे कारवाईचा वेग वाढला आहे. त्याचअंतर्गत नुकताच देसाई गावातील कांदळवनात सुरू असलेल्या हाटभट्टीवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग तसेच शीळ-डायघर आणि मुंब्रा पोलिसांनी संयुक्त मोठी कारवाई केली होती. याचप्रमाणे दिव्यातील खाडीमधील भट्टीवरही मुंब्रा पोलिसांनी कारवाई केली होती. या हाटभट्ट्यांवर कारवाई करण्यासाठी जाणाºया पोलिसांना मोठ्या अग्निदिव्यातून जावे लागते. ज्या खाडीमध्ये किंवा किनाºयावर हाटभट्टी सुरू असेल तेथील खाडीच्या भरती- ओहोटीच्या वेळानुसार पोलिसांना कारवाईचे नियोजन करावे लागते. खाडीच्यामध्ये किंवा टोकाला कांदळवनात लावण्यात येणाºया या भट्ट्यांपर्यंत पोहचण्यासाठी पोलीस बोटीचा वापर करतात. स्थानिकांनी जर बोट दिली नाही तर खाडीतील घाणीच्या पाण्यातून पोहत तसेच दलदलीमधून जेथे भट्टी सुरू आहे तेथपर्यत पोहचावे लागते, अशी माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरु ण क्षीरसागर यांनी दिली. घटनास्थळी तयार करून ठेवलेली हजारो लिटर दारू तसेच रसायन आणि ते तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे मोठमोठे ढोल, पिंप, गॅलन आदी प्रकारचे साहित्य पोलीस ताब्यात घेतात.हाटभट्टीवर जेव्हा-जेव्हा कारवाई होते तेव्हा क्वचितच तेथे कोणीतरी आढळते. याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की ज्या खाडीमध्ये भट्टी सुरू असते तेथील किनाºयावर भट्टी लावलेल्यांची माणसे गस्त घालत असतात.गरिबांच्या पोटात जातो रोज विषारी प्यालासमाजातील श्रीमंत वर्ग हा बार, पबमध्ये जाऊन मद्याचे प्याले रिचवतो. पण ज्याचे हातावर पोट आहे अशा गरीब, कष्टकऱ्यांना दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी सायंकाळच्यावेळेस गावठी दारूच्या दुकानांकडे पाय वळतात. स्वस्त आणि मस्त असलेही ही दारू म्हणजे विषारी प्याला असतो हे कदाचित या गरिबांना माहिती नसेल. रोजच गावठी दारू पोटात जात असल्याने ते एकप्रकारे आपल्या शरीराशीच खेळत असतात. विषारी दारूमुळे मृत्यूकांड झाल्याचे प्रकार घडले आहेत. त्यानंतर प्रशासनाने कठोर पावले उचलली. मात्र आज पुन्हा आर्थिक संबंधातून दारूच्या भट्ट्या लावणे सुरू आहे.विषारी दारू बनते कशी?सरकारमान्य देशी दारूच्या दुकानावर तीन प्रकारच्या मिळणारा दारूचा दर हा ३५ ते ४५ रुपये प्रती १८० मिली आहे. तर दुसरीकडे शहरात मिळणाºया हातभट्टीच्या दारूचा दर साधारणपणे १० रुपये प्रती ग्लास इतका आहे. मळी, संत्रे, लिंबू यांचा रस काढून त्यात इथेनॉलचे मिश्रण करून देशी दारू तयार केली जाते. यात सर्व घटकांचे प्रमाण ठरलेले असल्याने त्यापासून मिळणारी किकही मर्यादित असते. परंतु, रोजंदारीवर काम करणारे तसेच कमी पैशात जास्त किक हवी असणारे मद्यपी हातभट्टीच्या दारूकडे वळतात.हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी पाणी आवश्यक असल्याने दलदल, खदाणी, नदी अथवा खाडीकिनाºयाच्या जवळपास हातभट्टी तयार केली जाते. प्लास्टिकच्या मोठया ड्रममध्ये भरलेल्या पाण्यात मिथिनॉलसह सडकी फळे, काळा गूळ, नवसागर टाकण्यात येते. हे मिश्रण आंबवल्यानंतर काही दिवसांनी फेस येऊन एक कुबट वास यायला सुरूवात होते. त्यानंतर एका मोठया भांडयात द्रव्य ओतून त्याला अग्नी दिला जातो. यातील वाफेला द्रवरूप प्राप्त करत त्यापासून मिळणारे रसायन म्हणजेच गावठी दारू. अशारितीने तयार केलेल्या दारूमध्ये मिथीनॉलचे प्रमाण जास्त झाले तर ते धोकादायक ठरू शकते.पोलीस अधिकारी बदलताच कारवाईही थंड पडतेहातभट्ट्या आणि गावठी दारु विक्री विरोधात २०१७, २०१८ या दोन वर्षात ठाणे ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई हाती घेत हातभट्टी माफियांचे कंबरडे मोडले होते. हातभट्या शोधून काढण्यासाठी खबºयांसह ड्रोन व गुगल नकाशाचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला. पण पोलीस अधीक्षक आणि अधिकारी बदलले तशी हातभट्यांविरोधातील कारवाईही बंद झाली. हळूहळू लपूनछपून का होईना हातभट्या पुन्हा दारू गाळू लागल्या आणि विक्रीही सुरू झाली. चेणे - काजूपाडा, वरसावे - घोडबंदर व काशिमीरा येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे तर उत्तन - डोंगरी भागातील घनदाट जंगल आहे. त्याचप्रमाणे घोडबंदरपासून नवघर, चेणे - वरसावे, पेणकरपाडा, भार्इंदर पश्चिमेच्या मुर्धा, राई, मोर्वा ते डोंगरी आणि मीरा रोड पश्चिमेच्या नाझरेथ आगारपासून खोपरापर्यंतचे कांदळवनचे जंगल हे हातभट्टी लावण्यासाठी माफियांना अत्यंत सोयीचे ठरते. कारण कांदळवनचे जंगल आणि त्यात दलदलीतून हातभट्या शोधून काढणे अवघड ठरते. तीच बाब काशिमीरा वा उत्तनच्या जंगलातील आहे. अशा जंगलांमध्ये हातभट्टी लावणारे माफिया आणि गावागावात गावठी दारूचे गुत्ते चालवणारेही माफियाच. हातभट्टीची दारू जीवघेणी असल्याने कायद्याने त्यावर बंदी घालण्यात आली.बक्कळ कमाईची चटक लागलेल्या या माफियांना पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी, कर्मचाºयांचा आशीर्वाद नसेल तर नवलच म्हणावे लागेल. कारण राजरोस चालणारे हातभट्टीच्या दारूचे धंदे हे काही फुकट चालत नाहीत. कारवाई झालीच तर खानापुर्ती व्हायची. उत्तनमध्ये तर महिलांनी हातभट्टीच्या दारु विरोधात सातत्याने आवाज उठवत वेळ पडल्यास आंदोलने केली. कारण हातभट्टीच्या दारूमुळे कुटुंब उध्वस्त होण्याचे अनेक प्रसंग त्या महिलांनी अनुभवले होते. पण ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी असताना डॉ. महेश पाटील यांनी मीरा भार्इंदरमधील हातभट्या व या दारू माफियांना मोडून काढण्यासाठी खºया अर्थाने धडक मोहीम सुरू केली. इतकी वर्ष बिनबोभाटपणे चालणाºया या दारूच्या भट्या आणि गुत्ते पोलिसांच्या रडारवर आले. भार्इंदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र कांबळे, उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी सरोजना मोकलीकर या अधिकाºयांनी भार्इंदर पश्चिममधील हातभट्यांसह माफियांचे कंबरडे मोडून काढले.पोलीस कर्मचाºयांनीही तेवढीच महत्त्वाची साथ दिली. काशिमीरा येथील कांदळवनातील हातभट्या शोधणे आणि आत जाऊन त्या उध्वस्त करणे म्हणजे अत्यंत जिकरीचे व जोखमीचे काम. कांदळवनाच्या झुडपांमधून चिखल तुडवत तर कधी छोट्याशा होडक्यातून जाऊन पोलिसांनी हातभट्या उध्वस्त केल्या. हातभट्या शोधण्यासाठी गुगलच्या सॅटेलाईट नकाशासह ड्रोनचा वापर पोलिसांनी करून जंगलात कोणी पोहचणार नाही अशी हातभट्टीमाफियांची मस्ती उतरवून टाकली. कांबळे यांनी तर मुर्धा पासून केशवसृष्टीपर्यंतच्या कांदळवनात चालणाºया सहा हातभट्या ड्रोनच्या मदतीने एका दिवसात शोधून काढत उध्वस्त केल्या होत्या. ड्रोनच्या कॅमेºयातून कांदळवनात दडलेल्या हातभट्या शोधल्यावर पोलिसांचे पथक दलदलीतून वाट काढत आत जाऊन हातभट्या व तेथील साहित्य नष्ट करत होते. पुन्हा बाहेर येण्यासाठी गुगल मॅप वा ड्रोनची मदत घेतली गेली.१९९४ नंतरची हातभट्यांवरची सर्वात मोठी आणि धडक कारवाई गेल्या दोन वर्षात झाली. हातभट्या व अड्डे उध्वस्त

टॅग्स :liquor banदारूबंदीthaneठाणे