शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

'डोंबिवली उड्डाणपुलावर अवजड वाहनांना बंदी घाला'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:49 PM

ऑडिटसाठी आयआयटीला पत्र

- अनिकेत घमंडी डोंबिवली : पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या शहरातील कोपर दिशेकडील धोकादायक उड्डाणपुलावर अवजड वाहनांना बंदी घालावी, अशी सूचना मध्य रेल्वे प्रशासनाने कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाला दिली आहे. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सुनीलकुमार जैन यांच्या दालनात ३० मे रोजी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आयुक्त गोविंद बोडके यांच्यासमवेत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त महापालिकेला पाच दिवसांपूर्वी मिळाले आहे. त्यात, वरील सूचना केली आहे. मात्र, महापालिकेने अजूनही त्याची अंमलबजावणी न केल्याने पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे.रेल्वेकडून इतिवृत्त मिळताच महापालिकेच्या शहर अभियंत्यांच्या कार्यालयाने अवजड वाहनांना बंदी घालण्याबाबत वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्यासंदर्भात डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखेला वरिष्ठांकडून कोणतेही आदेश मिळालेले नाहीत. परिणामी, अवजड वाहनांना अद्याप पुलावर बंदी घालण्यात आलेली नाही. पुलावर नेहमी वाहतूककोंडी होते. मात्र, पूल धोकादायक असल्याने पावसाळ्यात अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे तत्काळ हा पूल अवजड वाहनांसाठी बंद करून वाहतूक अन्य मार्गाने वळवण्याचे नियोजन करावे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, पुलाचे पूर्ण आॅडिट करण्यासाठी महापालिकेने व्हीजेटीआयला आठ दिवसांपूर्वी पत्र दिले आहे. मात्र, त्याला अद्याप प्रतिसाद मिळाला नसल्याने आॅडिट थांबले आहे, असे सूत्रांनी सांगितले.डोंबिवलीतील कोपर उड्डाणपुलावर अवजड वाहनांना बंदी घालण्यासंदर्भात कल्याण-डोंबिवली महापालिकेचे पत्र मला मिळाले आहे. त्यासंदर्भात वाहतुकीत बदल, त्याचे नियोजन याबाबत सविस्तर नोटीफिकेशन एकदोन दिवसात आम्ही जाहीर करणार आहोत.- अमित काळे,उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे

टॅग्स :dombivaliडोंबिवली