शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

सदोष वेळापत्रकामुळे मध्य रेल्वेकडूनच मृत्यूचा सापळा?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 1:08 AM

मागील काही वर्षांपासून ठाणे स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात ट्रान्स-हार्बरची सेवा सुरू झाल्यापासून प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे विशिष्ट वेळेत ठाण्यात लोकलमध्ये चढणे जीवावर बेतते.

ठाणे : ठाण्यात ११ वाजून ११ मिनिटांनी आणि ११ वाजून १९ मिनिटांनी येणाऱ्या कल्याण लोकल हा मध्य रेल्वेने प्रवाशांकरिता टाकलेला मृत्यूचा सापळा असल्याची या उपनगरीय रेल्वेला लटकून प्रवास करणाऱ्यांची ठाम भावना आहे. या गाड्या कधीच वेळेवर येत नाहीत आणि त्यांच्याअगोदर पाठोपाठ ठाणे लोकल असल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या हस्तिदंती मनोºयात बसून वेळापत्रक तयार करणाऱ्या मठ्ठ अधिकाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडी, अशी प्रवाशांची भावना आहे. मागील काही वर्षांपासून ठाणे स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात ट्रान्स-हार्बरची सेवा सुरू झाल्यापासून प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे विशिष्ट वेळेत ठाण्यात लोकलमध्ये चढणे जीवावर बेतते. सकाळी ऑफिसला जाण्याच्यावेळी जशी गर्दी असते, तशीच गर्दी रात्री सव्वाअकरा ते साडेअकरा वाजता ठाणे स्थानकावर असते, यावर क्षणभर कुणी विश्वास ठेवणार नाही.

ठाणे स्थानकात रात्री १० वाजून ५१ मिनिटांची कल्याण, १० वाजून ५५ मिनिटांची टिटवाळा आणि १० वाजून ५९ मिनिटांची कल्याण लोकल आहे. त्यानंतर, दोन ठाणे लोकल असून मग ११ वाजून ११ मिनिटांनी कल्याण लोकल आहे. ही लोकल गेल्यावर पुन्हा ठाणे लोकल येते. त्यानंतर, ११ वाजून १९ मिनिटांची कल्याण लोकल येते. या दोन्ही कल्याण लोकल कधीही वेळेवर नसतात. त्यामधील एक रद्द केली जाते किंवा उशिरा येणार असते. दुसरी कल्याण लोकलही वेळेवर येतेच, असे नाही. त्यामुळे १० वाजून ५९ ची कल्याण लोकल (जी बऱ्याचदा वेळेवर असल्याने रिकामी जाते) गेल्यावर ठाण्यात येणाºया तीन ठाणे लोकलचे आणि त्याचवेळी ट्रान्स-हार्बरच्या लोकलमधून येणाºया तीन लोकलचे प्रवासी ठाणे रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक-२ वर खच्चून जमलेले असतात. बऱ्याचदा पुढील २० ते २५ मिनिटे लोकल नसल्याने या लोकलला लटकून, आत शिरण्याकरिता धडपडणाºया, ओरडणाºया प्रवाशांना घेऊन या लोकल जातात.

ठाणे लोकलमधून मुंबईतील खासकरून भायखळा येथील व्यापारी, कर्मचारी येतात. ते मुख्यत्वे कळवा, मुंब्रा किंवा पुढे जाणारे असतात. त्यांना पर्याय नसल्याने ठाणे लोकल पकडून ठाण्यात येतात. त्यामुळे त्यांची गर्दी, त्याचवेळी ट्रान्स-हार्बर मार्गावर १० वाजून ४४ मिनिटांची, १० वाजून ५५ मिनिटांची तसेच ११ वाजून सहा मिनिटांच्या लोकल ठाण्यात येतात. वाशी येथे घाऊक बाजारपेठ असल्याने तेथील व्यापारी, आयटी पार्क तसेच बरीच कार्यालये नवी मुंबईत स्थलांतरित झाल्यामुळे तेथील कर्मचारी अशी ही गर्दी रात्री ११ च्या सुमारास ठाणे स्थानकात होते. त्यात बऱ्याचवेळ लोकल नसल्याने ११ वाजून १९ मिनिटांच्या गाडीत जीव धोक्यात घालून प्रवास करतात. ‘अरे आगे बढो’ म्हणत अंगातील जोर काढून पुढे उभे असलेल्या प्रवाशांना अक्षरश: रेटत असतात. काही प्रवासी दारात दोन बोटांच्या चिमटीत दरवाजाच्या वरच्या बाजूस पकडून फुटबोर्डवर लटकत असतात. टिटवाळ्यापुढील प्रवाशांचे हाल१० वाजून ५५ मिनिटांची टिटवाळा लोकल गेली की, थेट ११ वाजून ३४ मिनिटांची कसारा लोकल आहे. त्यामुळे टिटवाळ्यापुढील प्रवाशांसाठी टिटवाळा गाडी गेली की, ४० मिनिटे गाडी नाही. पूर्वीच्या वेळापत्रकात ११ वाजून १६ मिनिटांची टिटवाळा लोकल होती, ती रद्द केली. त्यामुळे प्रवाशांच्या हालअपेष्टांत अधिकच भर पडली आहे.

वातानुकूलित दालनात बसून वेळापत्रकरेल्वे प्रशासनाच्या निर्बुद्ध कारभारामुळे लटकूनच प्रवास करावा लागत असल्याबद्दल जाब कुणाला विचारायचा, असा सवाल प्रवासी करत आहेत. परराज्यांतून उच्चपदावर येणाऱ्या व वातानुकूलित खोलीत बसून वेळापत्रक बनवणाऱ्यांनी एकदा लोकलमधून प्रवास करावा, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

टॅग्स :railwayरेल्वे