शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्ती योजनेमुळे पीककर्ज वाटपात बँका मेहरबान, ठाणे जिल्ह्यातील १६ हजार १४० शेतकऱ्यांना मिळाला लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 01:14 IST

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांपैकी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १५ हजार ८०१, तर इतर बँकांमध्ये ३३९  शेतकऱ्यांचे खाते आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांपैकी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १५ हजार ८०१, तर इतर बँकांमध्ये ३३९  शेतकऱ्यांचे खाते आहे. या १६ हजार १४० शेतकऱ्यांच्या बँक खात्यांचे गाव, संस्थानिहाय प्राप्त याद्यांचे आधार प्रमाणिकरण करून त्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ झाला आहे. यामुळे बँका पीककर्ज वाटपात यंदाही मेहरबान झाल्या असल्याचे शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे. या योजनेच्या  पहिल्या दिवशी दोन हजार ८२६ शेतकऱ्यांची खाती आधार लिंक करून त्यांच्या बँक खात्यात १७ कोटी ४६ लाख ९२ हजार रुपये ३  मार्च २०२०ला जमा करण्याचा विक्रम संबंधित प्रशासनाने केला होता. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना अल्पावधीतच या योजनेद्वारे दोन लाखांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे. या कर्ज योजनेमुळे मला ३० हजार रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे. या योजनेतून थकीत कर्जमाफ झाल्यामुळे आर्थिक विवंचना दूर झाली. यामुळे शासनाचे आभारी आहोत.     - रवींद्र लुटे, अघई, ता. शहापूर  दरवर्षी प्रामाणिकपणे मी कर्जफेड करीत असतो. ८५ हजारांचे पीककर्ज फेडण्यासाठी मी अन्य व्यक्तींकडून व्याजाने रक्कम घेऊन पीककर्ज भरले आहे; मात्र मला आजपर्यंतही शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ झालेला नाही. हा तर चोर सोडून संन्याशाला फाशी, असा प्रकार आहे.    - हरिचंद्र बागराव, सोगाव,  या योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या सध्या तरी उपलब्ध नाही.  मात्र, अन्य जिल्ह्याच्या तुलनेत यंदाही ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्जपुरवठा मोठ्या प्रमाणात झाला आहे.      - जयानंद भारती, लिड बँक, मॅनेजर, ठाणे या कर्जमाफीच्या रकमेसंबंधी प्राप्त तक्रारी सोडविण्यासाठी विविध पातळ्यांवर समित्या गठीत केल्या होत्या. या तक्रारींमध्ये अंगठ्याचा ठसा उमटत नसलेल्या तक्रारी अधिक होत्या. त्या संबंधित स्थानिक तहसीलदारांना प्राप्त होताच त्यावर लगेच निर्णय घेऊन शेतकऱ्यांना लाभ देणे शक्य झाले आहे. या योजनेद्वारे चाळीस हजारांचे कर्ज माफ झाल्याचे शहापूर तालुक्यातील वाशाळा येथील शेतकरी पांडुरंग धानके यांनी स्पष्ट करून शासनाचे आभार मानले, तर ६५ हजारांचे कर्ज माफ झाल्याचे नायकाचापाडा येथील राम आवार यांनी मान्य केले. 

टॅग्स :Farmerशेतकरीthaneठाणे