शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील रायलादेवी तलावात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 22:20 IST

केवळ हौसेखातर तलावात एका नादुरुस्त बोटीतून विहार करणा-या सहा मित्रापैकी एकाच्या जिवावर बेतल्याची घटना ठाण्यातील रायलादेवी तलावात घडली. या घटनेने पडवळनगर भागात हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देबोटीचे भगदाड बुजविण्यासाठी घेतली पाण्यात उडीपाण्यात रुतल्याने बुडून मृत्युबोटीतील इतर पाच जण बचावले

ठाणे: कॉलेजला जातो, असे सांगून घरातून सकाळी बाहेर पडलेल्या सहा मित्रांपैकी ऋतिक गणेश कदम (१७, रा. पडवळनगर, वागळे इस्टेट, ठाणे) याचा रायलादेवी तलावात बुडून मृत्यु झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. बोटीला भगदाड पडल्यामुळे बोटीतील पाणी काढण्याचे भांडेच तलावात पडले. ते काढण्यासाठीच त्याने उडी मारली आणि तो बुडाल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.देवेंद्र चंद्रकांत घाडगे (१७, रा. पडवळनगर, ठाणे), राज संतोष पवार (१६, रा. किसननगर, ठाणे), ओम अनिल डुंबरे (१६, रा. पडवळनगर, ठाणे), विश्वजित सोमनाथ पोमणे (१७, रा. पडवळनगर, ठाणे), आशिष संजीव शिंदे (१७, रा. पडवळनगर, ठाणे) आणि ऋतिक कदम हे ११ वीच्या वर्गात शिकणारे सहा मित्र बुधवारी दुपारी अचानक ठाण्याच्या रायलादेवी तलावातील बोटीतून सफर करण्यासाठी गेले. तलावातून जाण्यासाठी त्यांना बोटीतून जाण्याचा मोह आवरता आला नाही. ज्या बोटीत हे बसले तिला एक लहानसे भगदाड असल्यामुळे ती नादुरुस्त असल्याचे काही स्थानिकांनी त्यांना बजावलेही होते. पण, हौसेखातर त्यांनी बोटीतून सैर करण्याचा आनंद लुटण्याचा इरादा पक्का केला. ते साधारण २.३० वाजण्याच्या सुमारास या बोटीतून निघाले. बोट काही अंतरावर गेली असतांनाच बोटीत त्या भगदाडातून पाणी शिरु लागले. ते पाणीही हे मित्र एका डब्याच्या सहाय्याने अगदी मजेने बाहेर काढत होते. अचानक डबा खाली पडला. हाच डबा काढण्यासाठी ऋतिकने कपडे काढून पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला. त्याने उडीही मारली. पण तो डबा बाहेर काढण्यात अयशस्वी ठरला. गाळात रुतल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यु झाला. इकडे आपला मित्र बुडाल्याने प्रचंड भेदरलेल्या या मित्रांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला ही माहिती दिली. अग्निशमन दलाने तासाभराने साधारण ४.३० वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढला. उर्वरित पाचही जण या दुर्घटनेतून सुखरुप बचावले असले तरी आपला मित्र गेल्यामुळे त्यांनी हळहळ व्यक्त केली. सकाळी कॉलेजला जाऊन येतो, इतकेच घरातून बाहेर पडतांना ऋतिक बोलला होता, असे त्याचे वडील गणेश कदम यांनी सांगितले. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणे