मुंब्य्रात दोन हुक्का पार्लरवरील धाडीत दोन मालकासह चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 08:10 PM2018-01-30T20:10:18+5:302018-01-30T20:32:52+5:30

मुंबई एका हुक्का पार्लरमुळे कमला मिल भागात लागलेल्या आगीमुळे १४ जणांचा बळी गेला होता. याच पार्श्वभूमीवर ठाण्याच्या मुंब्य्रातही सोमवारी दोन हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली.

Two hukka parlors were arrested in Mumbra with two owners | मुंब्य्रात दोन हुक्का पार्लरवरील धाडीत दोन मालकासह चौघांना अटक

नशेच्या सामुग्रीसह साहित्य जप्त

Next
ठळक मुद्देसोमवारी रात्रीच्या वेळी कारवाईमुंब्रा बायपासवर नव्यानेच सुरु झाले होते पार्लरनशेच्या सामुग्रीसह साहित्य जप्त

ठाणे: दोन आठवडयांपूर्वीच मुंब्रा बायपास मार्गावर सुरु झालेल्या एका हुक्का पार्लरवर कळव्याचे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांच्या पथकाने धाड टाकून चार जणांना अटक केली. नशेसाठी त्यांनी वापरलेली सामुग्रीही त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे.
मुंब्रा परिसरात नव्यानेच दोन ठिकाणी हुक्का पार्लर सुरु झाल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे एसीपी धुमाळ यांच्यासह मुंब्रा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अतिष म्हेत्रे, पोलीस हवालदार सय्यद फिरोज, धनंजय घोडके, पोलीस नाईक तेजस परब आणि समाधान भोसले आदींच्या पथकाने सोमवारी रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा बायपासवरील ‘किंग ढाबा’ याठिकाणी छापा टाकून हुक्का पार्लरचा चालक महंमद अफरोज शेख तसेच इरफान शेख आणि राजपूत वर्मा या दोन ग्राहकांना तसेच अन्य एका हुक्का पार्लरमधून चालक इरफान मिर्झा अशा चौघांना अटक केल्याचे पोलीस निरीक्षक आर. बी. वळतकर यांनी सांगितले.
मुंबईच्या पार्श्वभूमीवर कारवाई
मुंबईत गेल्याच महिन्यात हुक्का पार्लरमधील आगीमुळे १४ जणांचा बळी गेला होता. याच पार्श्वभूमीवर ठाणे आणि परिसरातील अशा बेकायदेशीरपणे चालणा-या हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिले आहेत.

Web Title: Two hukka parlors were arrested in Mumbra with two owners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.