ठाणे मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी घेतलेल्या समन्वयामुळे गर्दी झाली कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 04:56 PM2020-03-26T16:56:42+5:302020-03-26T16:58:16+5:30

ठाण्यातील व्यापारी, भाजी विक्रेते यांनी पोलिसांच्या मदतीने काढलेल्या समन्वयामुळे स्टेशनच्या बाजारातील गर्दी कमी झाली आहे. परंतु वाढत्या महागाच्या झळा येथे येणाºया सर्व सामान्य ग्राहकांना सहन कराव्या लागत आहेत.

Due to the coordination of the traders in the Thane market, the crowd was less | ठाणे मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी घेतलेल्या समन्वयामुळे गर्दी झाली कमी

ठाणे मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी घेतलेल्या समन्वयामुळे गर्दी झाली कमी

Next

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात चोख पावले उचलली जात आहेत. जांभळी नाका ते स्टेशन परिसरातील मार्केटमध्येही व्यापारी, भाजी विक्रेते आणि पोलीस यांच्यातील समन्वयामुळे मार्केटमधील गर्दी होण्यास मदत झाली आहे. रस्त्यावर पहाटे बसणारे भाजी विक्रेते आणि मंडईमधील भाजी विक्रेते यांच्यात व्यावसायक करण्याची वेळ निश्चित झाली आहे. तर फळ विक्रेते आणि किराणा मालाच्या व्यापाऱ्यांनी देखील आता सुरक्षितता पाळली जात आहे.तसेच त्यांनी देखील आपल्या व्यावसायाच्या वेळा निश्चित केल्या आहेत. परंतु ही काळजी घेतली जात असतांनाच भाजीपाला इतर साहित्याच्या किमंती वाढल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजीचा सुर आहे.
           कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्टेशन परिसरातील मार्केटमध्ये व्यापाºयांनी आता समन्वय साधून पोलिसांच्या मदतीने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार पहाटे पाच ते १० या वेळेत फळ आणि भाजी विक्रेते या रस्त्यांवर बसणार आहेत. तर सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत किराणा मालाची दुकाने सुरु राहणार आहेत. त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही प्रकारची गर्दी न करता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्यावी असे आवाहन व्यापाºयांकडून करण्यात येत आहे. तसेच मार्केटमध्ये येणाºया प्रत्येक ग्राहकाच्या तोंडाला मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. एखाद्याने मास्क घातला नसेल तर त्याला परत पाठविले जात असल्याची माहिती ठाणे नगर पोलिसांनी दिली. तसेच येणाºया ग्राहकांच्या वाहनांना पार्कींग करण्यासाठी देखील जागेची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय दुकानात प्रवेश देतांना, सुरवातीला आवश्यक असलेल्या सामानाची चिठ्ठी घेतली जात असून एका वेळेस एकालाच प्रवेश दिला जात आहे.परंतु प्रवेश देतांनाही ग्राहकाच्या हाताला सॅनिटायझर लावले जात असून, तोंडाला मास्क लावण्यास सांगितले जात आहे. शिवाय दोन ग्राहकांमधील अंतरही तीन मीटर पर्यंतचे निश्चित करण्यात आले आहे. अशा पध्दतीने समन्वय साधून मार्केटमधील गर्दी कमी करण्याचा प्रयत्न व्यापाºयांकडून सुरु आहे.
दुसरीकडे जांभळीनाका ते स्टेशन परिसरात पहाटे बसणाºया भाजी विक्रेत्यांना भाजी विकण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यांच्या जागेवर मंडईतील भाजी विक्रेत्यांना जागा करुन दिली जाणार होती. परंतु तसे केल्यास आमच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होईल आमच्यावर उपासमारीची वेळ येईल त्यामुळे यावर तोडगा काढण्याची मागणी मागील ४० वर्षे रस्त्यावर भाजी विक्री करणाºया विक्रेत्यांनी केली होती. त्यावर आता ठाणे नगर पोलिसांनी तोडगा काढला असून पहाटे ४ ते सकाळी ७.३० वाजेपर्यंत रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर मंडईतील भाजी विक्री सुरु राहणार आहे. यामुळे मंडईतील गर्दी कमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
चौकट - अशा पध्दतीने समन्यव साधला जात असला तरी मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी येणाºया ग्राहकांनी वाढत्या भावाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बटाटे १० वरुन ३० ते ४० रुपये, कांदा ३० वरुन ८० रुपये, लसुण, टॉमेटो यांच्याही किमंतीत भरमसाठ वाढ झाल्याचे या ग्राहकांचे म्हणने आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी जगायचे कसे असा सवाल या नागरीकांनी उपस्थित केला आहे. मात्र मार्केटमध्ये माल येत नसल्याने या किमंती वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत. परंतु यावर योग्य तो तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.


  • फळ आणि भाजी विक्रेत्यांसाठी पहाटे ५ ते १० ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत किराणा मालाची दुकाने सुरु ठेवण्यात येत आहेत. गर्दी कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागरीकांना घाबरुन न जाता ज्या वेळा दिल्या आहेत, त्या वेळेतच यावे, शिवाय तोंडाला मास्क लावून यावे.

(जितेंद्र शर्मा - ठाणे मुख्य बाजारपेठ व्यापारी संघ - सचिव)
----------------------------------


  • गर्दी टाळण्यासाठी आम्ही रस्त्यावरील भाजी विक्रेते आणि मंडईतील भाजी विक्रेत्यांच्या वेळा निश्चित केल्या आहेत. त्यामुळे गर्दी विभागली जात असून येणाºया प्रत्येकाला मास्क शिवाय प्रवेश दिला जात नाही. तसेच नागरीकांनी देखील योग्य ते सहकार्य करावे.

(रामराव सोमवंशी - वरीष्ठ पोलीस निरिक्षक , ठाणे नगर पोलीस स्टेशन)


  • रोज जे सामान लागते तेच घ्यायला आलो आहोत, परंतु भाजीपाला महाग झाला आहे. कांदा, बटाटा, लसुण आदींसह इतर वस्तुंचे भाव वाढलेले आहेत. आता कामही बंद झाल्याने या वस्तु तरी घेणे कसे परडवणार आम्हाला त्याचे उत्तर शासनाने आम्हाला द्यावे.

(वनिता कोळी - गृहीणी)


  • किराणा सामान आधीच आम्ही भरुन ठेवले आहे. मात्र रोजच्या रोज लागणारी भाजी एकदाच घेणे शक्य नाही. ती घेण्यासाठी आलो आहे. मात्र सर्वच भाज्यांचे भाव वाढलेले आहेत. १० रुपयांचे टॉमेटो ३० रुपये झाले आहेत. सर्वच वस्तुंचे भाव वाढले आहेत.

(उमेश जेठवा - ग्राहक, ठाणेकर)

  • कांदे. टॉमेटो, लसुण, बटाटे या वस्तुंच्या किमंतीत २० ते ४० टक्के वाढ झाली आहे. काम बंद आहे, त्यात ही भाव वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे जगणे कठीण होऊ न गेले आहे. (प्रमीला जेठवानी - गृहीणी )

 

Web Title: Due to the coordination of the traders in the Thane market, the crowd was less

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.