शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

क्लस्टरमुळे ठाण्यातून झोपू योजना हद्दपार, सध्याच्या योजना मार्गी लावण्याचेच काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 06:40 IST

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) अंतर्गत योजना राबविण्यासाठी ठाण्यात स्वतंत्र कार्यालय सुरू केल्यानंतर आता स्वंतत्र सीईओ मिळणार आहे. परंतु, त्यांची नियुक्ती ही केवळ नाममात्रच ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. ठाण्यात आता क्लस्टरचे वारे वाहु लागलू असून शहरातील झोपडपट्टी भागही यात अंतर्भूत करण्यासाठीच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत.

- अजित मांडकेठाणे  - झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) अंतर्गत योजना राबविण्यासाठी ठाण्यात स्वतंत्र कार्यालय सुरू केल्यानंतर आता स्वंतत्र सीईओ मिळणार आहे. परंतु, त्यांची नियुक्ती ही केवळ नाममात्रच ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. ठाण्यात आता क्लस्टरचे वारे वाहु लागलू असून शहरातील झोपडपट्टी भागही यात अंतर्भूत करण्यासाठीच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या स्किम मार्गी लावण्यापलिकडे एसआरएकडे भविष्यात कामच शिल्लक राहणार नसल्यामुळे हे प्राधिकरणच ठाण्यातून हद्दपार होणार असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.ठाण्यात घोडबंदर मार्गावर एसआरएचे कार्यालय सुरू झाले आहे. त्यामुळे एसआरए योजना मंजूर करून घेण्यासाठी मुंबईला जाण्याच्या खेपा कमी होणार असल्या तरी त्या योजना लवकर मार्गी लागत नसल्याची खंत व्यक्त करण्यात येत होती. यामुळे या प्राधिकरणाला खास ठाण्यासाठी स्वतंत्र सीईओ मिळावा, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी विधानसभा अधिवेशनात केली होती. तिला मंजुरी मिळाल्याने येत्या काही महिन्यात ठाण्यासाठी स्वतंत्र सीईओ रूजू होऊन रखडलेल्या योजना मार्गी लागण्यास एक प्रकारे बळच मिळणार आहे. एसआरएची एकेक स्किम मार्गी लावण्यासाठी पाच ते सहा वर्षांचा कालावधी जात आहे. तर आता जी प्रकरणे ठाण्याच्या कार्यालयाकडे आली आहेत, तीदेखील येत्या काही वर्षात मार्गी लावली जाणार आहेत. ठाण्यात कार्यालय आल्याने एसआरएच्या फाईलींची संख्या वाढली आहे. ही बाब जरी खरी असली तरीदेखील आगामी काळात या सर्वच प्रक्रियेला किंबहुना या योजनेलाच खीळ बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.ठाण्यात क्लस्टरला मंजुरी मिळाली असून आयुक्त संजीव जयस्वाल यांनी येत्या आॅक्टोबर महिन्यात तिच्या पहिल्या टप्प्याचा नारळ वाढविला जाणार असल्याची घोषणा आहे. त्यानुसार वनविभाग, सीआरझेड, एमआयडीसी आदींसह इतर ठिकाणच्या जागा संबधींताना मोकळ्या करून दिल्या जाणार आहेत. या जागांवरच सर्वाधिक झोपडपट्यांची संख्या आहे. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार पालिका शहरातील ४३ सेक्टरमध्ये ही योजना राबविणार असून यामध्ये जवळजवळ संपूर्ण ठाणे शहराचाच समावेश आहे.पहिल्या टप्यात ही योजना ५ सेक्टरमध्ये राबविली जाणार असून त्या अतंर्गत तब्बल २३ टक्के जागा विकसित केली जाणार आहे. विशेष म्हणजे या योजनेचा आराखडा तयार करतांना पालिकेने चाळी, अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे असा उल्लेख करून झोपडपट्यादेखील त्यात कशा बसविता येईल, प्रयत्न केला आहे.ठाणे महापालिका हद्दीत २१० झोपडपट्या आहेत. त्यामध्ये सुमारे ९ लाख रहिवाशांचे वास्तव्य आहे. त्यानुसार एखाद्या पॉकेटमध्ये क्लस्टर योजना राबवायची झाल्यास त्याठिकाणी २५ टक्के झोपडपट्टी असल्यास तिचादेखील समावेश हा क्लस्टरमध्ये करता येऊ शकतो, त्यानुसारच ४३ सेक्टरमधील जवळजवळ प्रत्येक सेक्टरमध्ये अशा स्वरुपाचा आराखडा तयार केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. क्लस्टर योजनेमुळे ठाणेकरांना चांगली घरे मिळणार असून एकाच वेळेस समूह विकास साधला जाणार आहे. त्यामुळे याला योजनेला झोपडपट्टीमधील रहिवाशांचादेखील पाठिंबा मिळणार आहे. एकूणच याच प्रमुख बाबीमुळे एसआरए स्किमला एकप्रकारे खीळ बसणार असून भविष्यात ती किमान ठाणे शहरातून हद्दपार होण्याची भीती एसआरएच्या सूत्रांनी व्यक्त केली.एमएमआरडीए रिजनसाठी सीईओ असावाठाण्यात क्लस्टर योजना सुरू होणार असल्याने आपसुकच आता एसआरए योजनेला खीळ बसणार आहे. त्यामुळे नव्याने येणाऱ्या आयएएस दर्जाच्या सीइओंना ठाण्यात कामच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे एमएमआरडीए रिजनचा ठाण्यात समावेश केला तर सीईओंनादेखील काम करण्याची संधी मिळून इतर ठिकाणी त्यांचा अधिक फायदा होऊ शकतो, असे देखील आता बोलले जात आहे. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका