The drunken young man made a tiring; Four hours of rescue work | नशेबाज तरुणाने केली दमछाक; चार तास चालले बचावकार्य
नशेबाज तरुणाने केली दमछाक; चार तास चालले बचावकार्य

ठाणे : घोडबंदर रोडवरील भुयारी गटारात उडी घेतलेल्या रघुनाथ निलेश कोळी (३५) या नशेबाज तरुणाला बाहेर काढण्यासाठी मंगळवारी ठाणे महापालिकेच्या ३० ते ३५ कर्मचाऱ्यांची तब्बल चार तास दमछाक झाली. पोलीस आणि नागरिक पकडतील, या भीतीने तो भुयारी गटारात लपून बसला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी गटाराचा दीड फुटाचा स्लॅब पोकलेनच्या साहित्याने फोडण्यात आला. तब्बल चार तासांनंतर तो स्वत:हून बाहेर आला. यावेळी त्याने महापालिका अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. बघ्यांच्या गर्दीमुळे यावेळी वाहतूककोंडी झाली होती.

घोडबंदर रोड, मानपाडा आर मॉलसमोरील लॉकिंम कंपनी येथील भुयारी गटारातून एक व्यक्ती लोखंडी वस्तू बाहेर फेकत असल्याचे तेथून जाणाºया शाळकरी मुलांना दिसले. त्यांनी आवाज दिल्यावर तो पुढेपुढे जाऊ लागला. ही बाब त्या मुलांनी नागरिकांना सांगून १०० नंबर फोन करण्यास सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांना पाहून ते आपल्याला पकडतील, या भीतीने तो आतमध्येच दबा धरून बसला. पोलिसांनी तातडीने ठामपा आपत्ती कक्ष आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. दोन्ही विभागांच्या जवानांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. एक वेळा त्याचे केसही जवानांच्या हाती लागले, पण तो पुढेपुढे जात होता. दरम्यान, आपत्ती विभागाने पोकलेन मागवून दीड फुटाचा स्लॅब फोडण्यास सुरुवात केली. काही भाग फोडल्यानंतर ४ वाजण्याच्या सुमारास तो स्वत:हून बाहेर आला. तो बाहेर आल्याचे पाहून अधिकारी-कर्मचाºयांनी सुटकेचा नि: श्वास सोडला. त्यानंतर, त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला होता. तरूणाची दाढी-केस वाढले असून त्याच्या टी-शर्टवर पवार नाव तसेच १९ नंबर लिहिलेला होता.

अधिकाºयांना धक्काबुक्की
गटारातून बाहेर आल्यावर रघुनाथने अधिकाºयांना धक्काबुक्की केली. यावेळी झालेल्या झटापटीत त्याला मारहाण झाली. अखेर त्याला पोलिसांच्या हवाली केले.


Web Title: The drunken young man made a tiring; Four hours of rescue work
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.