अरेच्चा! 'तुमचीही 'ड्रिंक अँड ड्राइव्ह' टेस्ट करा' म्हणताच हुज्जत घालणारे पोलीस पळाले !
By सदानंद नाईक | Updated: February 28, 2025 20:04 IST2025-02-28T20:03:48+5:302025-02-28T20:04:32+5:30
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनीच पोलीस आयुक्तांकडे केली तक्रार

अरेच्चा! 'तुमचीही 'ड्रिंक अँड ड्राइव्ह' टेस्ट करा' म्हणताच हुज्जत घालणारे पोलीस पळाले !
सदानंद नाईक, उल्हासनगर: मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांची दुचाकी कल्याण वाहतूक पोलिसांनी अडवून ड्रिंक अँड ड्राइव्हचा आरोप केला. मात्र माझे एकट्याचे नव्हे तर तुमचीही ड्रिंक अँड ड्रायव्ह टेस्ट करण्याची गळ पोलिसांना बनसोडे यांना घालताच हुज्जत घालणाऱ्या पोलिसांनी काढता पाय घेतला.
उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे गुरुवारी सायंकाळी ६ वाजता रुग्णालयातून कल्याणकडे घरी निघाले. दरम्यान प्रेम ऑटो चौकातील पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरल्यावर, रस्त्यावर येताच एका मुलांनी नावाच्या पोलिसांनी त्यांना अडवून ड्रिंग अँड ड्राइव्हची टेस्ट घेण्यासाठी हुज्जत घातली. त्यावेळी डॉ बनसोडे यांना पोलिसच मद्यधुंद असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी माझे एकट्याचे नव्हेतर तुम्हचीही ड्रिंक अँड ड्राइव्ह टेस्ट करण्याची गळ घातली. तेंव्हा हुज्जत घालणाऱ्या पोलिसांनी तेथून काढता पाय घेतला.
या प्रकाराची तक्रार पोलीस आयुक्त यांच्याकडे डॉ बनसोडे यांनी लेखी स्वरूपात केली असून वाहतूक पोलिसांचा खरा चेहरा उघड झाल्याचा सूर आहे.