शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वसईत ११ कोटींचे अमली पदार्थ जप्त; २२ किलो ८६५ ग्रॅम मालासह नायजेरियनला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:12 IST

नायजेरियनसह बांगलादेशी नागरिकांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून याविरोधात विशेष मोहिम हाती घेण्याची मागणी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नासोपारा : एव्हरशाइन परिसरात ११ कोटी ५८ लाख ४१ हजार १०० रुपये किमतीचे २२ किलो ८६५ ग्रॅम मेफेड्रॉन व ४८ ग्रॅम कोकेन सापडले. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी एका नायजेरियनला अटक केल्याची माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत पोलिस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांनी दिली. दरम्यान नायजेरियनसह बांगलादेशी नागरिकांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून याविरोधात विशेष मोहिम हाती घेण्याची मागणी होत आहे.

५ एप्रिलला रात्री सव्वाबारा वाजता गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलिस हवालदार सचिन पाटील यांना एव्हरशाइन सिटी परिसरात व्हिक्टर नावाची व्यक्ती अमली पदार्थ विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला. यावेळी व्हिक्टर ओनुवाला उर्फ डाईक रेमंड (३७) याच्या घराची झडती घेतली. त्याच्या घरातून ४८ ग्रॅम कोकेन व त्याचा डाईक रेमंड या नावाचा बनावट पासपोर्ट मिळाला.  आरोपीला तपासासाठी वालीव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

विमानतळावर बांगलादेशी महिला ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अवैधरित्या भारतात प्रवेश करून वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेला विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे. साधना दास (२७) असे या महिलेचे नाव असून, तिला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

याप्रकरणी सहार पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार दास हिने २०२४मध्ये बंगळुरूच्या पासपोर्ट कार्यालयाला खोटे नाव, पत्ता तसेच चुकीची माहिती सादर करत गैरमार्गाने भारतीय पासपोर्ट मिळवला. त्यानंतर याच पासपोर्टच्या मदतीने तिने अद्याप तीन वेळा प्रवासही केला आहे. तसेच ६ एप्रिल रोजी ती मुंबईवरून ढाका (बांगलादेश) या ठिकाणी निघाली होती. मात्र, इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तिला ताब्यात घेतल्यावर हा सगळा प्रकार उघडकीस आला. कर्नाटकमधील हुबळी परिसरात असताना एका स्थानिक एजंटच्या मदतीने तिने भारतीय नागरिकत्त्वाच्या पुराव्याची कागदपत्रे मिळवली, असे तपासात उघड झाले आहे.   

वाशी गावात राहणाऱ्या बांगलादेशीवर कारवाई नवी मुंबई : वाशी पोलिसांनी एका बांगलादेशी नागरिकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद इस्लाम (३४) असे त्याचे नाव असून, तो वाशीगाव परिसरात झोपडीमध्ये राहत होता. वाशी पोलिसांकडून संशयितांची झाडाझडती घेतली जात असताना तो मिळून आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी