शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत ९ महिन्यांपासून ड्रग्जची मंडी! स्थानिक पोलिस निष्क्रिय; गुजरात पोलिसांच्या कारवाईनंतर मिळाली माहिती

By नितीन पंडित | Updated: August 9, 2024 13:26 IST

गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने कारवाई केल्यानंतर दोन दिवसांनंतर स्थानिक पोलिसांना कारवाईची माहिती दिली, हाच स्थानिक पोलिसांच्या अविश्वासार्हतेचा पुरावा मानला जात आहे.

भिवंडी : गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने ज्या फरिदा मंजिल इमारतीमधून ८०० कोटींचे ७९२ किलो लिक्विड एमडी ड्रग्ज हस्तगत केले, त्या इमारतीमध्ये गेल्या ९ महिन्यांपासून हा गोरखधंदा सुरू होता. स्थानिक पोलिसांना त्याचा मागमूसही लागला नाही की माहिती मिळूनही त्यांनी कारवाई टाळली, अशी पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर टीका सुरू झाली. 

गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने कारवाई केल्यानंतर दोन दिवसांनंतर स्थानिक पोलिसांना कारवाईची माहिती दिली, हाच स्थानिक पोलिसांच्या अविश्वासार्हतेचा पुरावा मानला जात आहे. गुजरात पोलिसांनी भिवंडीत केलेल्या कारवाईमुळे पोलिसांच्या बेपर्वाईवर समोर आली. नाशिक, पुणे ड्रग्ज रॅकेट प्रकरण शांत झाले असतानाच संवेदनशील भिवंडी  अमली पदार्थांचे माहेरघर बनत चालले आहे. 

इमारत कामवारी नदीपात्राच्या बाजूस -  गुजरात दहशतवादविरोधी पथकाने तीन दिवसांपूर्वी भिवंडीत मोठी कारवाई करून मोहम्मद युनूस, मोहम्मद आदिल यांना अटक केली. -  ज्या इमारतीत हा गोरखधंदा सुरू होता, ती इमारत शहरालगतच्या कामवारी नदीपात्राच्या बाजूलाच आहे. या घटनेआधी भिवंडीत ड्रग्जमाफियांवर कारवाई केली आहे. -  गेल्या महिन्यात १७ जुलै रोजी शहरात २ लाख ६६ हजार रुपये किमतीचा एमडीचा साठा बाळगणाऱ्या मोहम्मद साबीर शाह मोहम्मद खान (वय ४२ वर्षे, रा. धामणकर नाका) यास भोईवाडा पोलिसांनी अटक केली.-  २२ जुलै रोजी कसाईवाडा येथील शबाना अन्वर कुरेशी हिला अटक करून तिच्याजवळून २ किलो २ ग्रॅम वजनाचे २० लाख ७५ हजार रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले. 

पडक्या इमारती, मोकळी मैदाने, जंगलाचा भाग नशेखोरांचे अड्डेएक ग्रॅम एमडी पावडरची किंमत भिवंडीत १५०० ते २००० हजार रुपये आहे. शहरात पानमसाला सुपारीत एमडी पावडर मिळवून तरुण नशा करत असल्याची माहिती आहे. एमडी पावडर महाग असल्याने मित्रमंडळी भागीदारीत एमडी खरेदी करतात. शहरात एमडी पावडर ही कल्याण, मुंब्रा, मुंबई व आजूबाजूच्या ठिकाणाहून येते. 

मुंबई-नाशिक महामार्गावरील रांजनोली नाका बायपास रस्त्यावर याची खरेदी-विक्री होते. शहरातील गजबजलेल्या ठिकाणी अमली पदार्थांची खरेदी-विक्री होते. शहरातील मुस्लिमबहुल झोपडपट्टी भागात या पदार्थांची खरेदी-विक्री होते. 

शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हे प्रकार जास्त असल्याचे सूत्रांनी सांगितले. धोकादायक पडक्या इमारती, मोकळी मैदाने, बंद कारखाने, पाइपलाइन रस्ता, जंगलाचा भाग हे नशेखोरांचे प्रमुख अड्डे आहेत.

नशेखोरीमुळे महिला, अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. भिवंडी पोलिसांकडून शहरातील ड्रग्ज माफियांवर कारवाई होणे गरजेचे असताना पोलिस फक्त गांजा पिणाऱ्यांवर कारवाई करण्यात गर्क आहेत.

 

 

टॅग्स :bhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस