शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
5
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
6
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
7
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
8
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
9
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
10
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
11
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
12
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
13
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
14
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
15
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
16
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
17
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
18
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
19
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
20
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!

खड्डे चुकवण्यासाठी चालकांना करावी लागतेय कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:40 IST

कल्याण-डोंबिवली शहरांतील स्थिती : पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येईना, वाहनांचे अपघात होण्याची भीती

कल्याण : गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवली शहरांतील डांबरी रस्त्यांची खड्ड्यांमुळे पुरती चाळण झाली आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने ते किती खोल आहेत, याचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. त्यामुळे खड्डे चुकवण्यासाठी त्यांना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. दरम्यान, काँक्रिटच्या रस्त्यांवरील पेव्हरब्लॉकही काही ठिकाणी खचले आहेत. त्यामुळे यावरील प्रवासही धोकादायक झाला आहे.

केडीएमसीच्या यंदाच्या अर्थसंकल्पात रस्त्यांची देखभाल दुरुस्ती आणि खड्डे भरण्यासाठी प्रशासनाने ४० कोटींची तरतूद केली होती. पण, स्थायी समितीने त्यात वाढ करून ४५ कोटी ६५ लाख इतकी रक्कम ठेवली आहे. साधारणपणे पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात आणि पावसानंतर खड्डे भरण्याची कामे केली जातात. परंतु, सध्या केवळ खडी आणि मुरूम मातीचा भराव टाकून ते बुजविले जात आहेत. मागील शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे भराव टाकलेली खडी आणि माती वाहून गेली आहे. त्यामुळे पुन्हा खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचत आहे. परिणामी, खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने खड्ड्यांत आदळून अपघात होण्याचे प्रकारही घडत आहेत.कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौक ते आग्रा रोड, शंकर मंदिर-बेतुरकरपाडा रोड, मोहिंदरसिंग काबलसिंग विद्यालयालगतचा रस्ता, वसंत व्हॅली, अमृत पार्क, खडकपाडा, पत्रीपूल, बैलबाजार, कल्याण स्थानक रोड या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. शिवाजी चौक ते महंमदअली चौकदरम्यानच्या रस्त्यावरील पेव्हरब्लॉक खचल्याने तिथेही खड्ड्यांची रांगोळी पाहायला मिळत आहे. पूर्वेकडील महत्त्वाच्या असलेल्या पुणे लिंक काँक्रिट रोडवर जेथे डांबर आहे, तेथे खड्डे पडले आहेत. तेथील मॅनहोलभोवती लावलेले पेव्हरब्लॉकही वरखाली झाल्याने मॅनहोल धोकादायक स्थितीत आहेत. स्व. आनंद दिघे उड्डाणपुलापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत खड्डे पडले असून, खडेगोळवली रस्त्यावरही तशीच स्थिती पाहायला मिळत आहे.राज्य रस्ते महामंडळांतर्गत येणाºया कल्याण-शीळ रस्त्याचीही खड्ड्यांमुळे वाताहत झाली आहे. डोंबिवली पूर्व-पश्चिम भागांतही अनेक रस्ते खड्ड्यांत गेले आहेत. पूर्वेतील न्यू कल्याण रोड, घरडा सर्कल, टिळक चौक, निवासी विभागातील मानपाडा रोड, सागाव-सागर्ली, जिमखाना रोड, भोपर, संदप, आयरेगाव, पंचायत विहीर परिसर, ठाकुर्ली, ९० फुटी रस्ता येथे खड्डे पडले आहेत. महत्त्वाचे म्हणजे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका कार्यक्रमानिमित्त डोंबिवली जिमखाना येथे आले होते. त्यावेळी त्यांच्या मार्गातील रस्ते सुस्थितीत करण्यात आले होते. परंतु, ते रस्तेही आता खड्ड्यांत गेल्याचे घरडा सर्कल येथील वास्तव पाहता स्पष्ट होते. पश्चिमेतील गणेशनगर, जुनी डोंबिवली, राजूनगर, गरिबाचावाडा, महाराष्ट्रनगर, देवीचापाडा, मोठागाव ठाकुर्ली येथील रस्त्यांचीही चाळण झाली आहे. शहरातील चौकांच्या परिसरात खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावत असल्याने कोंडीत भर पडत आहे.‘तो’ रस्ता ठरतोय गैरसोयीचाच्म्हसोबा चौक ते पंचायत बावडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने तो गैरसोयीचा झाला आहे. या अरुंद रस्त्यावर सातत्याने वाहतूककोंडी होते. त्यात आता खड्ड्यांचीही भर पडली आहे.च् या रस्त्यालगत असलेल्या रेल्वेच्या जागेतून मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी रस्त्यावर येत असल्याने तेथे मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे पंचायत बावडीक डे जाणाºया वाहनचालकांना हा खड्डा वाचवताना अक्षरश: कसरत करावी लागत आहे.च्काहीवेळेस दुचाकी असो अथवा तीनचाकी गाड्याही जोरदार या खड्ड्यात आदळत आहेत. हा खड्डा खडी आणि मातीचा भराव टाकून बुजवण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु रेल्वेच्या जागेतून येणाºया पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने केलेला उपाय निरुपयोगी ठरला आहे. त्यामुळे तेथे गटार बनवावे, अथवा रस्त्याखालून मोठे पाइप टाकावेत, अशी मागणी होत आहे.पेव्हरब्लॉक खचले :बंदीश पॅलेस ते विको नाका या काँक्रिटच्या रस्त्यावरही वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. काँक्रिटच्या पॅचला लागून असलेले पेव्हरब्लॉक खचल्याने डांबर वाहून गेले असून, त्यात पाणी साचत आहे. त्यामुळे चालकांना या रस्त्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने काही वेळा आदळत आहेत. रस्त्याच्या कडेला गटारांचे काम रखडल्याने पाणी रस्त्यावरूनच वाहत आहे.

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण