खड्डे चुकवण्यासाठी चालकांना करावी लागतेय कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:40 AM2019-08-01T00:40:01+5:302019-08-01T00:40:08+5:30

कल्याण-डोंबिवली शहरांतील स्थिती : पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येईना, वाहनांचे अपघात होण्याची भीती

Drivers have to work to miss the pits | खड्डे चुकवण्यासाठी चालकांना करावी लागतेय कसरत

खड्डे चुकवण्यासाठी चालकांना करावी लागतेय कसरत

Next

कल्याण : गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवली शहरांतील डांबरी रस्त्यांची खड्ड्यांमुळे पुरती चाळण झाली आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने ते किती खोल आहेत, याचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. त्यामुळे खड्डे चुकवण्यासाठी त्यांना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. दरम्यान, काँक्रिटच्या रस्त्यांवरील पेव्हरब्लॉकही काही ठिकाणी खचले आहेत. त्यामुळे यावरील प्रवासही धोकादायक झाला आहे.

केडीएमसीच्या यंदाच्या अर्थसंकल्पात रस्त्यांची देखभाल दुरुस्ती आणि खड्डे भरण्यासाठी प्रशासनाने ४० कोटींची तरतूद केली होती. पण, स्थायी समितीने त्यात वाढ करून ४५ कोटी ६५ लाख इतकी रक्कम ठेवली आहे. साधारणपणे पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात आणि पावसानंतर खड्डे भरण्याची कामे केली जातात. परंतु, सध्या केवळ खडी आणि मुरूम मातीचा भराव टाकून ते बुजविले जात आहेत. मागील शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे भराव टाकलेली खडी आणि माती वाहून गेली आहे. त्यामुळे पुन्हा खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचत आहे. परिणामी, खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने खड्ड्यांत आदळून अपघात होण्याचे प्रकारही घडत आहेत.
कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौक ते आग्रा रोड, शंकर मंदिर-बेतुरकरपाडा रोड, मोहिंदरसिंग काबलसिंग विद्यालयालगतचा रस्ता, वसंत व्हॅली, अमृत पार्क, खडकपाडा, पत्रीपूल, बैलबाजार, कल्याण स्थानक रोड या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. शिवाजी चौक ते महंमदअली चौकदरम्यानच्या रस्त्यावरील पेव्हरब्लॉक खचल्याने तिथेही खड्ड्यांची रांगोळी पाहायला मिळत आहे. पूर्वेकडील महत्त्वाच्या असलेल्या पुणे लिंक काँक्रिट रोडवर जेथे डांबर आहे, तेथे खड्डे पडले आहेत. तेथील मॅनहोलभोवती लावलेले पेव्हरब्लॉकही वरखाली झाल्याने मॅनहोल धोकादायक स्थितीत आहेत. स्व. आनंद दिघे उड्डाणपुलापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत खड्डे पडले असून, खडेगोळवली रस्त्यावरही तशीच स्थिती पाहायला मिळत आहे.
राज्य रस्ते महामंडळांतर्गत येणाºया कल्याण-शीळ रस्त्याचीही खड्ड्यांमुळे वाताहत झाली आहे. डोंबिवली पूर्व-पश्चिम भागांतही अनेक रस्ते खड्ड्यांत गेले आहेत. पूर्वेतील न्यू कल्याण रोड, घरडा सर्कल, टिळक चौक, निवासी विभागातील मानपाडा रोड, सागाव-सागर्ली, जिमखाना रोड, भोपर, संदप, आयरेगाव, पंचायत विहीर परिसर, ठाकुर्ली, ९० फुटी रस्ता येथे खड्डे पडले आहेत. महत्त्वाचे म्हणजे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका कार्यक्रमानिमित्त डोंबिवली जिमखाना येथे आले होते. त्यावेळी त्यांच्या मार्गातील रस्ते सुस्थितीत करण्यात आले होते. परंतु, ते रस्तेही आता खड्ड्यांत गेल्याचे घरडा सर्कल येथील वास्तव पाहता स्पष्ट होते. पश्चिमेतील गणेशनगर, जुनी डोंबिवली, राजूनगर, गरिबाचावाडा, महाराष्ट्रनगर, देवीचापाडा, मोठागाव ठाकुर्ली येथील रस्त्यांचीही चाळण झाली आहे. शहरातील चौकांच्या परिसरात खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावत असल्याने कोंडीत भर पडत आहे.

‘तो’ रस्ता ठरतोय गैरसोयीचा
च्म्हसोबा चौक ते पंचायत बावडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने तो गैरसोयीचा झाला आहे. या अरुंद रस्त्यावर सातत्याने वाहतूककोंडी होते. त्यात आता खड्ड्यांचीही भर पडली आहे.
च् या रस्त्यालगत असलेल्या रेल्वेच्या जागेतून मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी रस्त्यावर येत असल्याने तेथे मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे पंचायत बावडीक डे जाणाºया वाहनचालकांना हा खड्डा वाचवताना अक्षरश: कसरत करावी लागत आहे.
च्काहीवेळेस दुचाकी असो अथवा तीनचाकी गाड्याही जोरदार या खड्ड्यात आदळत आहेत. हा खड्डा खडी आणि मातीचा भराव टाकून बुजवण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु रेल्वेच्या जागेतून येणाºया पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने केलेला उपाय निरुपयोगी ठरला आहे. त्यामुळे तेथे गटार बनवावे, अथवा रस्त्याखालून मोठे पाइप टाकावेत, अशी मागणी होत आहे.

पेव्हरब्लॉक खचले :बंदीश पॅलेस ते विको नाका या काँक्रिटच्या रस्त्यावरही वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. काँक्रिटच्या पॅचला लागून असलेले पेव्हरब्लॉक खचल्याने डांबर वाहून गेले असून, त्यात पाणी साचत आहे. त्यामुळे चालकांना या रस्त्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने काही वेळा आदळत आहेत. रस्त्याच्या कडेला गटारांचे काम रखडल्याने पाणी रस्त्यावरूनच वाहत आहे.

Web Title: Drivers have to work to miss the pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.