कारवाई टाळण्यासाठी जॅमरसह चालकाचे पलायन
By Admin | Updated: February 17, 2017 02:05 IST2017-02-17T02:05:11+5:302017-02-17T02:05:11+5:30
वाहतूक शाखेची कारवाई टाळण्यासाठी एका कारचालकाने जॅमरसह पलायन केल्याची घटना बुधवारी सकाळी शहरातील जुना आग्रा मार्गावर

कारवाई टाळण्यासाठी जॅमरसह चालकाचे पलायन
कल्याण : वाहतूक शाखेची कारवाई टाळण्यासाठी एका कारचालकाने जॅमरसह पलायन केल्याची घटना बुधवारी सकाळी शहरातील जुना आग्रा मार्गावर घडली आहे.
पश्चिमेतील जुना आग्रा मार्गावरील डी-मार्टसमोर नो-पार्किंगमध्ये कार उभी करण्यात आली होती. त्यात चालक नसल्याने गस्तीवरील वाहतूक पोलिसांनी कारच्या चाकाला जॅमर लावला. कारचालकाने ते चाक काढून तेथे स्टेपनीतील चाक बसवून पलायन केले.
याप्रकरणी सरकारी जॅमर चोरी करून नेल्याप्रकरणी कल्याण शहर वाहतूक शाखा उपविभागातील पोलीस नाईक दिनेश कटके यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यानुसार, कारचालकाविरु द्ध गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)