पादचाऱ्यास जखमी करणारा कारचालक अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:39 IST2021-04-13T04:39:02+5:302021-04-13T04:39:02+5:30
ठाणे : कारच्या धडकेत प्रकाश वाघरे (वय ३५, रा. आनंदनगर, कोपरी, ठाणे) हे पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी ...

पादचाऱ्यास जखमी करणारा कारचालक अटकेत
ठाणे : कारच्या धडकेत प्रकाश वाघरे (वय ३५, रा. आनंदनगर, कोपरी, ठाणे) हे पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी कारचालक मोहम्मद करीम अब्दुल आहद शेख (३१) याला कोपरी पोलिसांनी अटक केली.
आनंदनगर चेकनाक्याजवळील नाशिक-मुंबई वाहिनीवरून वाघरे हे १० एप्रिलरोजी रात्री ८ वाजण्याच्यासुमारास आपल्या घरी जात होते. त्याचवेळी भरघाव आणि बेदरकारपणे आलेल्या शेख यांच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्यास आणि उजव्या पायाला जबर मार लागला. त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, कारचालक शेख याच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात कलम २७९, ३३७ आणि १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक केली असून, त्याची ठाणे न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अजय तिडके हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.